पुण्यात दुकानं उघडण्यास काय अडचण आहे? अजित पवारांनी दिला पोलिसांना दणका

पुण्यात दुकानं उघडण्यास काय अडचण आहे? अजित पवारांनी दिला पोलिसांना दणका

पुण्यातील दुकानं उघडण्यास पोलिस हरकत घेत आहेत. या मुद्द्यावरून पुण्यातील व्यापारी महासंघानं शनिवारी पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेतली.

  • Share this:

पुणे, 6 जून: पुण्यातील दुकानं उघडण्यास पोलिस हरकत घेत आहेत. या मुद्द्यावरून पुण्यातील व्यापारी महासंघानं शनिवारी पालकमंत्री अजित पवार यांची भेट घेतली. काही भागात पोलिस दुकानं उघडू देत नसल्याबाबत व्यापाऱ्यांनी पालकमंत्र्यांकडे गाऱ्हाणं मांडलं. अजित पवारांनी या प्रकरणी गंभीर दखल घेत पोलिसांची चांगलीच कान उघाडणी केली.

हेही वाचा...धक्कादायक! नाशिकरांची तहान भागवणाऱ्या धरणात मिसळलं विषारी औषध

दुकानं उघडण्यास काय अडचण, असा सवाल उपस्थित करून अजित पवार यांनी पोलिसांना दणका दिला. महानगरपालिका आयुक्तांनी 90 टक्के पुणे ओपन केलं असलं तरी काही भागात पोलीस दुकानं उघडू देत नसल्याची व्यापाऱ्यांची तक्रार होती. त्यावर अजित पवारांनी प्रशासनाला हा प्रश्न तातडीने मार्गी लावण्याचे निर्देश दिले आहे.

सोमवारी व्यापाऱ्यांची पोलिस आणि प्रशासनासोबत बैठक होईल, त्यानंतर पुणे शहरातील दुकाने उघडू शकतील, अशी आशा पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका यांनी व्यक्त केली आहे. पुण्यातील 6000 होलसेल दुकान असून ती अजूनही बंदच असल्याचं रांका यांनी सांगितलं आहे.

दरम्यान, उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार यांची पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फतेचंद रांका , उपाध्यक्ष रतन किराड, सचीव महेंद्र पितलिया, अतुल अष्टेकर, विपल अष्टेकर यांनी कॉन्सिल हॉलमध्ये भेट घेवून रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरूवार, शुक्रवार, भवानी, रास्ता , गणेश, नाना पेठ, येरवडा, या विभागातील दुकाने उघडण्यास विनंती केली.  या बैठकीला पुणे महानगरपालिका आयुक्त गायकवाड, आयुक्त सौरभ राव, विभागीय आयुक्त म्हैसकर उपस्थित होते.

हेही वाचा...जावयानं सासूला ट्रॅक्टरनं चिरडलं, परस्पर पुरला मृतदेह; धक्कादायक प्रकार उघड

व्यापारी महासंघाचं म्हणणं ऐकून घेतल्यावर अजित पवार यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. अद्यापपर्यंत दुकाने का उघडली गेली नाहीत, असा प्रश्न सौरभ राव यांना विचारला असता त्यांनी पोलिसांनी हरकत घेतल्याची सांगितले. पुणे व्यापारी महासंघसोबत तातडीने संयुक्त मिटींग बोलवून त्वरित निर्णय घेण्याचा आदेश अजित पवार यांनी प्रशासनाला दिला आहे.

First published: June 6, 2020, 3:29 PM IST

ताज्या बातम्या