Home /News /pune /

Pune: पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचं थैमान, कठोर निर्बंध लावणार? अजित पवारांच्या उपस्थितीत आढावा बैठकीत होणार निर्णय

Pune: पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये कोरोनाचं थैमान, कठोर निर्बंध लावणार? अजित पवारांच्या उपस्थितीत आढावा बैठकीत होणार निर्णय

 प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Pune News: पुण्यासह पिंपरी चिंचवड परिसरात कोरोना बाधितांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. आज पालकमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत कोरोना स्थितीची आढावा बैठक होत आहे. या बैठकीत काय निर्णय होतो हे पहावं लागेल.

    पुणे, 15 जानेवारी : संपूर्ण राज्यात कोरोनाचा संसर्ग (Coronavirus) वेगाने होत आहे. मुंबईत कोरोना बाधितांच्या संख्येत काही प्रमाणात घसरण झाली असली तरी पुणे आणि पिंपरी चिंचवड परिसरात कोरोना (Coronavirus cases in Pune and Pimpri Chinchwad) बाधितांचा आकडा काही कमी होताना दिसत नाहीये. त्यामुळे आता पुण्यात कठोर निर्बंध लागू करण्यात येण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. आज पुण्याचे पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) यांच्या उपस्थितीत कोरोना स्थितीचा आढावा घेणारी बैठक होत आहे या बैठकीत कठोर निर्बंध (Strict restrictions) लागू होण्याची शक्यता आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे पुण्यातील कोरोना स्थितीचा आढावा बैठक घेणार आहेत. दुपारी 4 वाजता ही बैठक होणार आहे. विभागीय आयुक्त कार्यलयात ही बैठक होणार आहे. या बैठकीत पुण्यात कठोर निर्बंध लावण्याच्या संदर्भात चर्चा होऊन निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. पुण्यातील कोरोना बाधितांच्या संख्येत होणारी वाढ कायम असल्याचं दिसत आहे. ही रुग्णांची संख्या रोखण्यासाठी आता कठोर निर्बंध लावणं आवश्यक असल्याचं बोललं जात आहे. 'या' देशात मास्क आणि लसीकरणाची आवश्यकता नाही, सरकारनेच घेतला निर्णय पुण्यातील कोरोनाची स्थिती पुण्यात काल (14 जानेवारी 2022) 5480 कोरोना बाधितांची नोंद झाली आणि 2674 रुग्णांनी करोनावर मात केली. आजपर्यंत पुण्यातील कोरोना बाधितांची खएकूण संख्या 548569 इतकी झाली आहे. तर आतापर्यंत 510793 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर पुण्यात 13 जानेवारी रोजी 5571 नव्या रुग्णांची नोंद झाली होती आणि 2335 रुग्णांनी कोरोनावर मात केली होती. पुण्यात सहा दिवसांत तब्बल चौपट लहान मुले कोविड पॉझिटिव्ह मोठ्यांप्रमाणेच लहान मुलांनाही कोरोनाचा संसर्ग होत असल्याचं पहायला मिळत आहे. पुण्यात लहान मुलांना कोरोनाचा संसर्ग होण्याची संख्या वाढत आहे. गेल्या सहा दिवसांत तब्बल चौपट मुलांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पुणेकरांनो लहान मुलांची विशेष काळजी घेणं खूपच आवश्यक आहे. पुण्यात सहा दिवसांत चारपट लहान मुले कोरोना बाधित झाल्याचं समोर आलं आहे. मोठयांप्रमाणे लहान मुलांनाही कोरोनाचा संसर्ग होत आहे. बालकांमध्येही कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून येत आहेत. 1 डिसेंबर ते 11 जानेवारी या कालावधीत 0 ते 11 वयोगटातील 2488 मुलांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पुणे शहरात 0 ते 10 आणि 11 ते 20 वयोगटातील कोरोनाबधितांची संख्या सहा दिवसात चारपटीने वाढली आहे. लहान मुलांमध्ये कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने चिंता वाढली आहे. डॉक्टरांकडून लहान मुलांची काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. मुलांना सर्दी, ताप, खोकला असेल तर चाचणी करुन घेण्याचं आवाहनही करण्यात आलं आहे.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Coronavirus, Pimpri chinchawad, Pune

    पुढील बातम्या