हे फक्त पुण्यातच घडू शकतं! आठवलेंच्या Corona Go नंतर पुण्याचा हा VIDEO व्हायरल!

हे फक्त पुण्यातच घडू शकतं! आठवलेंच्या Corona Go नंतर पुण्याचा हा VIDEO व्हायरल!

काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

  • Share this:

 पुणे 20 मार्च: काही महिन्यांपूर्वी सोशल मीडियाच्या माध्यमातून पुण्यातले सफाई कर्मचारी रातोरात फेमस बनले होते. त्यांनी एक व्हिडीओ तयार करत पुणेकरांना कचरामुक्तीचे धडे दिले. त्यांचा व्हिडीओ फेमस झाल्यानंतर पालिकेने त्यांना ब्रँड अम्बेसेडर म्हणून नियुक्त केलं होतं. आता कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी एक गाणं तयार केलं असून कोरोनापासून दूर राहण्यासाठी काय केलं पाहिजे याचे धडे दिले आहेत. त्यांचा हा व्हिडीओही चांगलाच व्हायरल झाला आहे. प्रसिद्ध हिंदी गाण्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हा व्हिडीओ तयार केला आहे.

घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात पुणेकरांना साद घालणारे महादेव जाधव हे झाडूवाले काका सध्या सोशल मीडियावर भलतेच फेमस झाले आहेत. त्यांचा व्हिडिओ व्हायरल होताच पालिकेनंही देखील त्यांच्या प्रबोधनपर कार्याची दखल घेतली होती. त्यांना चक्क पुणे मनपाचाच्या कचरा मुक्त मोहिमेचं बँन्ड अम्बेसिडर बनवलं होतं.  आता त्यांनी पुन्हा नवं गाणं तयार केलंय. काही दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता.

परदेशातून आलेले कोरोनाचे चार संशयित रुग्ण इगतपुरी येथून फरार

विशेष म्हणजे या गाण्याची शब्द रचना देखील त्यांनीच केली आहे. प्रसार माध्यमांनी प्रकाशझोतात आणल्याने कामात आणखी हुरूप त्यांनी सांगितलं आहे. या आधी त्यांनी काही पथ नाट्यही सादर केले आहेत.

तुमचं काम भले मग ते कोणतही असो त्यात जर तुम्ही स्वतःला शंभर टक्के झोकून दिले तर कालांतराने लोकही तुम्हाला प्रतिसाद देऊ लागतात हेच त्यांनी आपल्या कामाने दाखवून दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे.

 

First published: March 20, 2020, 4:52 PM IST

ताज्या बातम्या