पुण्यात कोरोनाची लस घेतल्यानंतर कशा होत्या प्रतिक्रिया? जाणून घ्या 6 महत्त्वाच्या अपडेट्स

पुण्यात कोरोनाची लस घेतल्यानंतर कशा होत्या प्रतिक्रिया? जाणून घ्या 6 महत्त्वाच्या अपडेट्स

आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये लसीकरणाविषयी उत्साह होता व त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

  • Share this:

पुणे, 16 जानेवारी : राज्यात आजपासून कोरोना लसीकरण मोहीम सुरु झाली. राज्यातील 285 केंद्रांवर उत्साहात आरोग्य कर्मचाऱ्यांनी लस घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राष्ट्रीयस्तरावरील शुभारंभानंतर महाराष्ट्रात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सकाळी साडे अकराच्या सुमारास मोहिमेचा राज्यस्तरीय शुभारंभ झाला.

पुणे जिल्ह्यातही 1802 आरोग्य कर्मचाऱ्यांचे यशस्वीरित्या कोविड लसीकरण करण्यात आले. एकंदरीत आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये लसीकरणाविषयी उत्साह होता व त्यांच्याकडून चांगला प्रतिसाद मिळाला.

पुणे जिल्ह्यातील कोरोना लसीकरणातील ठळक मुद्दे :

1. लसीकरण पश्चात प्रतिकूल प्रतिक्रिया उद्भवल्या नाहीत

2. सर्व सेवा सत्राच्या ठिकाणी AEFI व्यवस्थापन करण्यासाठी प्रशिक्षित डॉक्टर सुसज्ज रुग्णवाहिका व किट सह उपस्थित होते

3. सर्व सत्राच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात लस उपलब्ध करून देण्यात आली होती

4. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे लसीकरण राबविण्यात आले.

5. सॉफ्टवेअरमध्ये सुरुवातीच्या काळात तांत्रिक अडचणी आढळून आल्या.

6. काही ठिकाणी लाभार्थ्यांना SMS मिळाले नाहीत.

दरम्यान, पुणे जिल्ह्यात आज 3100 पैकी 1802 कोरोना वॉरीयर्सनी लस घेतली. पुण्यात फक्त आजचा दिवस लसीकरण नियोजित होतं. तसंच यापुढचे टप्पे हे देखील सरकारच्या यापुढील सुचनेनुसारच राबवले जाणार आहेत. आज दिलेल्या लसीकरणातून काही साईड इफेक्ट दिसताहेत का? हे पाहण्यासाठी देखील प्रशासनाला वेळ हवा आहे. त्यामुळे किमान पुण्यात तरी लसीकरणाची मोहिम ही फक्त आजच्या पुरती मर्यादित होती, अशी माहिती पुणे मनपा आयुक्त रूबल आगरवाल यांनी दिली आहे.

Published by: Akshay Shitole
First published: January 16, 2021, 10:59 PM IST

ताज्या बातम्या