मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्यात कोरोनाचे 22 हॉटस्पॉट...पण पालिकेकडून उपाययोजना नाहीत, गंभीर आरोप

पुण्यात कोरोनाचे 22 हॉटस्पॉट...पण पालिकेकडून उपाययोजना नाहीत, गंभीर आरोप

तर उरलेल्य क्लस्टर्समध्ये थकव्याचे तीन प्रकार आहेत अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

तर उरलेल्य क्लस्टर्समध्ये थकव्याचे तीन प्रकार आहेत अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

पुणे मनपात एकहाती सत्ता असणाऱ्या भाजपची अडचण झाली आहे.

पुणे, 3 मे : पुण्यात कोरोनाचे 22 हॉटस्पॉट तयार झालेले असतानाही पालिका प्रशासनाकडून योग्य त्या उपाययोजना केल्या जात नसल्याचा गंभीर आरोप पुणे मनपातील विरोधीपक्षांनी केला आहे. काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे, राष्ट्रवादीच्या गटनेत्या दिपाळी धुमाळ, मनसेचे वसंत मोरे आणि शिवसेनेचे गटनेते पृथ्वीराज सुतार या चारही विरोधी पक्षाच्या गटनेत्यांनी आज पालिकेत संयुक्त पत्रकार परिषद घेऊन मनपाच्या प्रशासनाला धारेवर धरलं. संस्थात्मक क्वारन्टाइन सेंटरमध्ये सोईसुविधांची वानवा असून कोरोना मयतांच्या अंत्यविधीबाबत मनपा प्रशासन उदासीन असल्याचा आरोप विरोधी पक्षनेत्यांनी केला आहे. तसंच शहरातील झोपडपट्टी भागात फैलावलेली कोरोनाची साथ आटोक्यात आणण्यात पालिका प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप अरविंद शिंदे आणि दिपाळी धुमाळ यांनी केला आहे. त्यामुळे पुणे मनपात एकहाती सत्ता असणाऱ्या भाजपची अडचण झाली आहे. दरम्यान, पूर्ण पुणे शहर आणि जिल्हा हा रेड झोनमध्ये आहे. शहरात अनेक हॉटस्पॉट आहेत आणि कंटेन्मेंट परिसर आहे. त्यामुळे 17 मेपर्यंत कडक निर्बंध असतील, असं पालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सांगितलं. रेड झोनमध्ये दारूची दुकानं, सलून सुरू होतील अशी चर्चा होती. परंतु, पुण्यात लॉकडाउनच्या काळात दारूची दुकानं सुरू होणार नाही, असं पालिका आयुक्तांनी स्पष्ट केलं आहे. पुणे शहर आणि ग्रामीण भागात कंटेन्मेंट झोन अर्थात अतिसंक्रमणशील (सील केलेला भाग ) सोडून इतर ठिकाणी फिजीकल डिस्टसिंग पाळून बांधकाम क्षेत्रातील कामे सुरू करता येतील, असं जिल्हाधिकारी यांनी स्पष्ट केलं आहे. पण, बांधकाम क्षेत्रातही 17 मेपर्यंत कामे सुरू होणार नाहीत, असं आता पालिका आयुक्तांनी स्पष्ट केलं. संपादन - अक्षय शितोळे
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Coronavirus, Pune news

पुढील बातम्या