पुणेकरांनो सतर्क राहा! कोरोनामुळे 24 तासांत आणखी दोन मृत्यू

पुणेकरांनो सतर्क राहा! कोरोनामुळे 24 तासांत आणखी दोन मृत्यू

धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासांत पुण्यातील दोन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एक 60 वर्षींची ज्येष्ठ महिला आहे तर दुसरा 48 वर्षांच्या व्यक्तीचा समावेश आहे.

  • Share this:

पुणे, 05 एप्रिल : देशभरात कोरोनाग्रस्तांची संख्या 3 हजाराच्यावर गेली आहे. त्यातही सर्वात जास्त रुग्ण म्हणजे 600 हून अधिक रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. मुंबई आणि पुण्याला कोरोनाचा धोका सर्वात जास्त आहे. धक्कादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासांत पुण्यातील दोन कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये एक 60 वर्षींची ज्येष्ठ महिला आहे तर दुसरा 48 वर्षांच्या व्यक्तीचा समावेश आहे. या दोघांवरही ससून रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांना कोरोनाची लागण झाल्याचा रिपोर्ट रात्री उशिरा आला होता. या रिपोर्टमध्ये कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट लिहिलं होतं.

या कोरोनाग्रस्त 60 वर्षीय महिलेला काही दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्यानं उपचारासाठी नायडू रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यावेळी कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली होती. या महिलेला पुन्हा काल अस्वस्थ वाटू लागल्यानं नायडू रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. मात्र उपचारादरम्यान या महिलेचा मृत्यू झाला आहे. या महिलेचा रिपोर्ट उशिरा आला त्यावेळी तिला करोनाची लागण झाल्याची धक्कादायक बाब समोर आली.

हे वाचा-डोंबिवलीकरांनो, सावध व्हा! कोरोनामुळे एका महिलेचा मृत्यू

पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या जवळपास 70 वर गेली आहे. आतापर्यंत कोरोनामुळे तीन जणांचा मृत्यू झाला आहे तर चौथा मृत्यू कोरोनामुळेचं झाला की नाही याबाबत ससून रुग्णालयाकडून अद्याप कन्फर्म माहिती देण्यात आली नाही. सर्वात पहिल्यांदा कोरोनाचे रुग्ण पुण्यात सापडले होते. त्यानंतर मुंबईत पण मुंबईत कोरोनाग्रस्तांची संख्या जवळपास 330 आहे तर त्यामुळे एकट्या मुंबईत मृतांचा आकडा 22 वर पोहोचला आहे. त्यापाठोपाठ आता पुण्यातही कोरोनाचा धोका वाढत असल्याचं दिसत आहे.

हे वाचा-एकीकडे 12 हजार लोकांचा मृत्यू, तरी स्पेनमधील 'या' शहराने रोखला कोरोना

First published: April 5, 2020, 11:48 AM IST

ताज्या बातम्या