पुण्यात कोरोनाची परिस्थिती आणखी चिंताजनक, 24 तासातील रेकॉर्डब्रेक आकडेवारी समोर

पुण्यात कोरोनाची परिस्थिती आणखी चिंताजनक, 24 तासातील रेकॉर्डब्रेक आकडेवारी समोर

पुण्यात गेल्या 15 दिवसांत तब्बल 50 नवे झोन कोरोनाबाधित बनले आहे.

  • Share this:

पुणे, 2 जुलै : महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. मुंबई आणि पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढली आहे. पुण्यात वाढती संख्या पाहता  कोरोना मायक्रोझोनची पुन्हा नव्याने फेरचना जाहीर झाली आहे. तर गेल्या 24 तासामध्ये आतापर्यंत सर्वाधिक मृत्यूची नोंद झाली आहे.

पुणे जिल्ह्यात गेल्या 24 तासामध्ये  तब्बल1251 रूग्णांची वाढ झाली आहे. यात पुणे मनपा क्षेत्रात 860 , पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रात 282, पुणे ग्रामीण हद्दीत 64 तर कॅन्टॉनमेंट परिसरात 45 नवे रूग्ण आढळून आले आहेत. एकाच दिवसात झालेली ही जिल्ह्यातील सर्वाधिक वाढ आहे.

गंभीर बाब म्हणजे, एकाच दिवसात 25 जणांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे मृत्यूदर कमी करण्याचे लक्ष ठेवल्यानंतर प्रशासनाला ना मृत्यूदर कमी करता येत आहे ना रूग्णसंख्या. त्यामुळे पुण्यात परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक बनत चालली आहे.

डिलिव्हरी बॉयच्या हातात बॉक्समध्ये झाला स्फोट, घडला विचित्र प्रकार

दरम्यान, पुण्यात याआधी 74 कोरोना प्रतिबंधित झोन होते. त्यापैकी 15 मायक्रोझोन कोरोनामुक्त झाले होते. नवीन आदेशातून या 15 मायक्रोझोनची नावं वगळली आहे. तर गेल्या 15 दिवसांत तब्बल 50 नवे झोन कोरोनाबाधित बनले आहे.

9 मायक्रोझोनची फेरचना केल्याने पुणे शहरात आता 109 मायक्रोझोन तयार झालं  असून त्याचे एकूण क्षेत्रफळ 6.69 स्वेअर किलोमीटर इतके असणार आहे. पुणे मनपा आयुक्त शेखर गायकवाड यांनी 'न्यूज18 लोकमत'ला ही माहिती दिली.

गाय, म्हैस नव्हे तर गाढविणीच्या दुधापासून तयार केलं जातं जगातील सर्वात महाग चीझ

शहरातील बोपोडो, दत्तवाडी, हडपसर, येरवड्यासह कोथरूड, एरंडवनामध्येही कोरोनाचा फैलाव मोठ्या प्रमाणात वाढला आहे. त्यामुळे नव्याने फेररचना करण्यात आली आहे.

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 1,80,289 वर

दरम्यान, राज्यातल्या कोरोना रुग्णांची संख्या वाढतच आहे. (Maharashtra covid 19 patient) गेल्या  24 तासांमध्ये तब्बल 5537 नव्या रुग्णांची वाढ झाली असून ही विक्रमी संख्या आहे.  त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 1,80,289 वर गेली आहे. राज्यात आज 189 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. राज्यात आत्तापर्यंत 8053 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आज 2243 जण बरे होऊन घरी गेलेत. राज्याचा मृत्यू दर 4.47 एवढा झाला आहे. 79,095 एवढे Active रुग्ण आहेत.

मुंबईत एकूण रुग्ण  79145 रुग्ण आहेत.  त्यातले 29715 रुग्ण हे Active आहेत. शहरात आज 69 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे एकूण मृत्यूची संख्या 1487वर गेली आहे.

संपादन - सचिन साळवे

First published: July 2, 2020, 8:43 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading