कोरोना व्हायरस: पार्थ पवारांनी अचानक घेतली आयुक्तांची भेट, पिंपरी-चिंचवडमधील स्थितीचा आढावा

कोरोना व्हायरस: पार्थ पवारांनी अचानक घेतली आयुक्तांची भेट, पिंपरी-चिंचवडमधील स्थितीचा आढावा

राष्ट्रवादीच्या कोणत्याही स्थानिक नेत्यांना सोबत न घेताच पार्थ पवार महापालिकेत जाऊन आयुक्तांची भेट घेतली.

  • Share this:

पिंपरी चिंचवड, 12 जुलै : राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार यांनी पिंपरी चिंचवडचे महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांची शनिवारी अचानक भेट घेऊन शहरातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी केलेल्या चर्चेमध्ये पार्थ पवार (Parth Pawar) यांनी महापालिकेच्या प्राथमिक शिक्षकांना 7 वा वेतन लागू करण्याबाबत चर्चा केली. त्याच बरोबर कोरोना परिस्थितीवर लक्ष ठेवण्यासाठी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी उभारलेल्या वॉर रूमलाही भेट दिली.

पार्थ पवार यांनी आपल्या भेटी बाबत अत्यंत गुप्तता पाळली. राष्ट्रवादीच्या कोणत्याही स्थानिक नेत्यांना सोबत न घेताच पार्थ पवार महापालिकेत जाऊन आयुक्तांची भेट घेतली. खरंतर पिंपरी चिंचवडमध्ये लॉकडाऊनच्या काळात शेकडो कामगार,मजूर स्थलांतरित झाले. अनेकांची उपासमार झाली , हजारो लघु उद्योग बंद पडण्याच्या परिस्थितीत गेले आहेत, शेकडो तरुण ,आय. टी. कर्मचारी बेरोजगार झाले तेव्हा पार्थ पवार कुठे होते? असा प्रश्न विचारला जात आहे.

परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं चित्र आहे. आत्तापर्यंत इथे तब्बल 138 रुग्णांचा मृत्यू झाला. रुग्णांसाठी बेड उपलब्ध नाहीत. उपचार घेणाऱ्या रुग्णांना नीट सुविधा मिळत नाहीत. कोरोनाच्या काळात केल्या गेलेल्या कोट्यवधींच्या खरेदीवर प्रश्नचिन्ह निर्माण केलं जातं आहे. या प्रश्नांचा जाब विचारणं अपेक्षित असताना पार्थ पवार अशी गुपचूप बैठक घेऊन स्वतःच त्याचा गव गवा करत निघून जातात या बाबतही आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

दरम्यान, मागच्या आठवड्यात पिंपरी चिंचवड शहरातील जेष्ठ नेते माजी विरोधीपक्ष नेते, विद्यमान नगर सेवक असलेल्या दत्ता साने यांच्या कोरोनामुळे मृत्यू झाला. राष्ट्रवादीचे सर्वेसर्व शरद पवार यांनी आणि त्यांच्या पाठोपाठ राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले होते. मात्र आज पार्थ पवार शहरात येऊनही साने यांच्या कुटुंबियांना भेट देण्यासाठी जाऊ शकले नाहीत.

Published by: Akshay Shitole
First published: July 12, 2020, 10:31 AM IST

ताज्या बातम्या