मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्यात कोरोनाच्या दहशतीचा परिणाम, कुटुंबाला सोसायटीमध्ये 'नो एण्ट्री'

पुण्यात कोरोनाच्या दहशतीचा परिणाम, कुटुंबाला सोसायटीमध्ये 'नो एण्ट्री'

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

एकीकडे जिल्हाधिकाऱ्यांकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत असताना पुण्यात वेगळीच घटना समोर आली आहे.

    पुणे, 13 मार्च : पुण्यामध्ये कोरोनाचे 10 रुग्ण आढळल्याने नागरिकांमध्ये काहीसं भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. 'पुण्यातील 10 पैकी 9 कोरोना रूग्ण हे फॉरेन रिटर्न आहेत. फक्त तो ओला ड्रायव्हर तेवढा लोकल ट्रान्समिट म्हणजेच आपल्या राज्यात संसर्गित आहे. ड्राय कफ म्हणजेच कोरडा खोकला असणाऱ्यांनी विनाकारण घाबरून जाऊ नये,' असं आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केलं आहे. एकीकडे जिल्हाधिकाऱ्यांकडून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत असताना पुण्यात वेगळीच घटना समोर आली आहे. मलेशियावरून आलेल्या एका कुटुंबाला पुण्यातील सोसायटीत प्रवेशच नाकारण्यात आला आहे. त्यामुळे कोरोना व्हायरसबाबत नागरिकांमध्ये किती भीती पसरली आहे, याचा अंदाज येऊ शकतो. कोरोनाबाबत जिल्हाधिकाऱ्यांचं आवाहन 'कोरोनाचा रूग्ण नक्कीच बरा होऊ शकतो. कोरोना बाधित 85 टक्के लोकांना कळणार पण नाही की आपल्याला इनफेक्शन झालं आहे. रोगप्रतिकारक शक्तीच्या जोरावर ते आपोआप बरे होतील. फक्त 10 ते 12 टक्के लोकांना त्रास होऊ शकतो,' अशी माहिती नवल किशोर राम यांनी दिली आहे. हेही वाचा- कोरोनाचा धोका वाढल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी घेतले अनेक मोठे निर्णय 'पुणे विभागातील इतर चारही जिल्ह्यांमध्ये कोरोनासंबंधीच्या उपाययोजना सज्ज ठेवल्या आहेत. पुणे महसुली विभागात पुणे, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली हे जिल्हे येतात. कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात नजीकच्या काळातील फॉरेन रिटर्न नागरिकांना कॉरनटाईन केलं आहे. त्यांना काही दिवस आयसोलेट राहण्याच्या सूचना केल्या आहेत,' अशी माहितीही नवल किशोर राम यांनी दिली.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Corona virus, Pune news

    पुढील बातम्या