मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

राज्यातल्या ‘कोरोना’ग्रस्तांची संख्या 17 वर, पुण्यात 311 देखरेखीखाली

राज्यातल्या ‘कोरोना’ग्रस्तांची संख्या 17 वर, पुण्यात 311 देखरेखीखाली

'नागरीकांनी घाबरण्याचं कारण नाही. काळजी घेणं हा त्यावरचा सर्वात चांगला उपाय आहे.'

'नागरीकांनी घाबरण्याचं कारण नाही. काळजी घेणं हा त्यावरचा सर्वात चांगला उपाय आहे.'

'नागरीकांनी घाबरण्याचं कारण नाही. काळजी घेणं हा त्यावरचा सर्वात चांगला उपाय आहे.'

पुणे 13 मार्च : राज्यातल्या कोरोनाग्रस्तांची संख्या वाढली आहे. आता ही संख्या 17 वर गेली आहे अशी माहिती पुण्याचे आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे. पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. पुण्यातल्या रुग्णांची संख्या 10वर गेली असून नागपूरातही आणखी दोन जणांची चाचणी पॉझिटीव्ह आली आहे. पुण्यात 311 जणांना देकरेखीखाली ठेवण्यात आल्याची माहितीही त्यांनी दिली. लोकांनी कुठलीही माहिती फॉरवर्ड करण्याआधी खात्री करावी. चुकीची माहिती पसरविणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले. आतापर्यंत 8777 घरांचे सर्वेक्षण केलं आहे. ज्यांना काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत त्यातल्या फक्त 24 जणांना रुग्णालयात ठेवण्यात आलं असून इतर सर्वांना घरीत एकांतात राहण्यास सांगण्यात आलं आहे अशी माहितीही आयुक्तांनी दिली. नागरीकांनी घाबरण्याचं कारण नाही. काळजी घेणं हा त्यावरचा सर्वात चांगला उपाय आहे असंही ते म्हणाले. पुणे विभागातील इतर चारही जिल्ह्यांमध्ये कोरोनासंबंधीच्या उपाययोजना सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. कोल्हापूर, सोलापूर जिल्ह्यात नजीकच्या काळातील फॉरेन रिटर्न नागरिकांना कॉरनटाईन केलं जाणार आहे . त्यांना काही दिवस आयसोलेट राहण्याच्या सूचना करण्यात आल्याची माहिती म्हैसकर यांनी दिली.

कोरोना : MPSCची परीक्षा पुढे ढकला, 96 हजार विद्यार्थी चिंतेत

कोरोना व्हायरस संदर्भातील माहिती घेण्यासाठी तुम्ही विविध लिंक ओपन करत असाल तर सावधान. कारण  तुम्ही  ही माहिती घेण्यासाठी ज्या link Open करताच तुमची तुमची वयक्तिक माहीती चोरली जाऊ शकते. त्याचबरोबर तुमची आर्थिक लूटही होऊ शकते. त्याचबरोबर तुम्ही कोरोना बाबत चुकीची माहिती पसरवत असाल तरीही सावधान रहा कारण तुमच्यावर आहे सायबर विभागाची करडी नजर असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. सध्या जगभर कोरोनाबद्दलची माहिती शोधण्यासाठी कोट्यवधी लोक इंटरनेटवर माहिती घेत आहेत. coronavirusmap.com आणि अशा अनेक Links लोकांच्या whatsappवरही येत आहेत. कोरोना व्हायरस बाबतची माहिती घेण्यासाठीच्या उत्सुकतेने जर तुम्ही या लिंक ओपन केली तर तुम्ही फसवलं जाण्याचा धोका आहे. गिरीश महाजन यांच्या 'होमटाऊन'मध्ये एका आठवड्यात 4 शेतकऱ्यांच्या आत्महत्या अशा अनेक लिंक तुमच्या मोबाईलवर पाठवून सायबर हल्ला करणारे गुन्हेगार तुमची वयक्तिक माहिती घेण्यासाठी सज्ज झाले आहेत आणि त्यांनीच हा मालवेयर तयार केला असल्याची माहिती पिंपरी चिंचवडच्या पोलीस सायबर सेलचे प्रमुख सुधाकर काटे यांनी दिली आहे.
Published by:Ajay Kautikwar
First published:

Tags: Corona virus, Corona virus in india

पुढील बातम्या