मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

‘कोरोना’ची माहिती घेण्यासाठी Link ओपन करताना सावधान, रिकामं होऊ शकतं तुमचं बँक अकाउंट

‘कोरोना’ची माहिती घेण्यासाठी Link ओपन करताना सावधान, रिकामं होऊ शकतं तुमचं बँक अकाउंट

त्याचबरोबर तुम्ही कोरोना बाबत चुकीची माहिती पसरवत असाल तरीही सावधान रहा कारण तुमच्यावर आहे सायबर विभागाची करडी नजर आहे.

त्याचबरोबर तुम्ही कोरोना बाबत चुकीची माहिती पसरवत असाल तरीही सावधान रहा कारण तुमच्यावर आहे सायबर विभागाची करडी नजर आहे.

त्याचबरोबर तुम्ही कोरोना बाबत चुकीची माहिती पसरवत असाल तरीही सावधान रहा कारण तुमच्यावर आहे सायबर विभागाची करडी नजर आहे.

 पुणे 13 मार्च :  कोरोना व्हायरस संदर्भातील माहिती घेण्यासाठी तुम्ही विविध लिंक ओपन करत असाल तर सावधान. कारण  तुम्ही  ही माहिती घेण्यासाठी ज्या link Open करताच तुमची तुमची वयक्तिक माहीती चोरली जाऊ शकते. त्याचबरोबर तुमची आर्थिक लूटही होऊ शकते. त्याचबरोबर तुम्ही कोरोना बाबत चुकीची माहिती पसरवत असाल तरीही सावधान रहा कारण तुमच्यावर आहे सायबर विभागाची करडी नजर असल्याचं पोलिसांनी सांगितलंय. सध्या जगभर कोरोनाबद्दलची माहिती शोधण्यासाठी कोट्यवधी लोक इंटरनेटवर माहिती घेत आहेत. coronavirusmap.com आणि अशा अनेक Links लोकांच्या whatsappवरही येत आहेत. कोरोना व्हायरस बाबतची माहिती घेण्यासाठीच्या उत्सुकतेने जर तुम्ही या लिंक ओपन केली तर तुम्ही फसवलं जाण्याचा धोका आहे. अशा अनेक लिंक तुमच्या मोबाईलवर पाठवून सायबर हल्ला करणारे गुन्हेगार तुमची वयक्तिक माहिती घेण्यासाठी सज्ज झाले आहेत आणि त्यांनीच हा मालवेयर तयार केला असल्याची माहिती पिंपरी चिंचवडच्या पोलीस सायबर सेलचे प्रमुख सुधाकर काटे यांनी दिली आहे. कोरोना : MPSCची परीक्षा पुढे ढकला, 96 हजार विद्यार्थी चिंतेत पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयातील सायबर विभाग कोरोनाच्या ह्या सायबर व्हायरस बद्दल  केवळ अशा सूचना देऊनच थांबले नाही, तर असे गुन्हे रोखण्यासाठी  त्यांनी एक स्वतंत्र पथकही कार्यरत ठेवलं आहे,आणि ह्या पथकामार्फत अशा गुन्ह्यांवर नजर ठेवली जात आहे. कोरोना बाबत चुकीची माहिती पसरविणाऱ्यावरही या विभागामार्फत गुन्हे दाखल केले जाणार असल्याचंही काटे यांनी सांगितलं.

कोरोनाचा जगभर धुमाकूळ, नगर जिल्ह्याला 600 कोटींचा फटका

कोरोना वायरसची लागण होऊ नये म्हणून जसं तुम्ही मास्क सॅनिटाइझर वापरून स्वतःचा जिव सुरक्षित ठेवत आहात. अगदी त्याच प्रमाणे कोणत्याही उत्सुकतेपोटी तुमच्या मोबाइल वर आलेली कोणतीही अनोळखी लिंक, व्हिडीओ किंवा मेसेज न उघडल्यास तुमची वयक्तिक  माहिती आणि ऑनलाइन पद्धतीने आर्थिक चोरी होण्यापासून तुम्ही वाचू शकाल त्याच बरोबर तुम्ही चुकीची माहिती व्हायरल होणार नाही  असंही पोलिसांनी सांगितलंय.
First published:

पुढील बातम्या