मुंबईत पोहोचला धोकादायक कोरोना व्हायरस? पुण्याच्या लॅबने समोर आणल्या रुग्णांच्या चाचण्या

मुंबईत पोहोचला धोकादायक कोरोना व्हायरस? पुण्याच्या लॅबने समोर आणल्या रुग्णांच्या चाचण्या

चीनमध्ये व्हायरसमुळे आतापर्यंत 41 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 800 रुग्ण संक्रमित आहेत.

  • Share this:

पुणे, 25 जानेवारी : कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) वाढत्या संसर्गामुळे शहरात नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. अशात भारतासाठी एक दिलासा देणारी बातमी समोर आली. कोरोना विषाणूची लागण झालेल्या चार रुग्णांच्या चाचण्या नेगेटिव्ह आल्या आहेत. मुंबई (Mumbai )सह बंगळुरू आणि हैदराबादमधून कोरोनाने बाधित रुग्ण असल्याचं समोर आलं होतं. चार रुग्णांपैकी दोन मुंबईतील, एक हैदराबाद आणि एका बंगळुरूचा आहे. रुग्णांच्या चाचणीचा अहवाल आयसीएमआर-एनआयव्ही पुण्यात तपासला असता तो नकारात्मक आला. त्यामुळे देशात अद्याप कोरोना विषाणू पसरला नसल्याचं सांगण्यात येत आहे. चीनमध्ये व्हायरसमुळे आतापर्यंत 41 लोकांचा मृत्यू झाला आहे तर 800 रुग्ण संक्रमित आहेत.

मुंबईतील दोन्ही संशयित रुग्णांना कस्तुरबा रुग्णालयात (Kasturba Hospital)दाखल करण्यात आले होते. चीनमधील (China) कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत 41 लोकांचा मृत्यू झाला आहे. फ्रान्समध्ये कोरोना विषाणूच्या तीन घटनांची पुष्टी झाली आहे. फ्रेंच आरोग्यमंत्री एग्नेस बुजिन यांनी सांगितले की, पहिले प्रकरण दक्षिण-पश्चिम शहरात आढळले आणि दुसरे प्रकरण पॅरिसमध्ये आढळले. त्याच वेळी, तिसरा व्यक्ती बळी पडलेला नातेवाईक असल्याचे सांगितले जात आहे. असे म्हणतात की, हे तिन्ही रुग्ण चीनमधून परतले आहेत. तिन्ही रुग्णांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.

इतर बातम्या - अजित पवार यांचे मेहुणे आणि पदमसिंह पाटील यांचे बंधू अमरसिंह पाटील यांचे निधन

चीनच्या अनेक शहरांमध्ये जाण्यास बंदी

कोरोना विषाणूमुळे चीनच्या शहरांवरील हालचालींवर पूर्णपणे बंदी घातली आहे. चीनमध्ये 41 मृत्यू व्यतिरिक्त 830 लोक संक्रमित आहेत. वुहानसह 9 शहरे बंद करण्यात आली आहेत. वुहानमध्ये 700 हून अधिक भारतीय विद्यार्थी अभ्यास करतात. त्या संदर्भात चीनने प्रशासनाशी बोलणे केले आहे.

यापूर्वी अहवालानुसार, चीनमधून परत आलेल्या दोन लोकांना कोरोना विषाणूची (Corona virus) लागण होण्याची भीती होती. या दोन्ही रूग्णांना मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, दोन्ही रुग्णांमध्ये हलकी थंडी व सर्दीची लक्षणे आहेत. सध्या रुग्णालयात दाखल झालेल्या रूग्णांना याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.

इतर बातम्या - फाशी टाळण्यासाठी एकही संधी सोडत नाहीत निर्भयाचे आरोपी, आता पुन्हा वापरला पर्याय

First published: January 25, 2020, 11:57 AM IST
Tags: mumbai

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading