Home /News /pune /

पुण्यात कोरोनाच्या भीतीने आईने घरात कोंडलेल्या 11 वर्षीय मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

पुण्यात कोरोनाच्या भीतीने आईने घरात कोंडलेल्या 11 वर्षीय मुलाचा आत्महत्येचा प्रयत्न

कोरोनाच्या भीतीने आईने घरात कोंडून ठेवलेल्या 11 वर्षीय मुलाने गळफास लावून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पिंपरी- चिंचवड, 22 मार्च: कोरोनाच्या भीतीने आईने घरात कोंडून ठेवलेल्या 11 वर्षीय मुलाने गळफास लावून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पिंपरीतील थेरगाव परिसरात रविवारी ही घटना उघडकीस आली आहे. पण दैव बलवत्तर म्हणून मुलाचा जीव थोडक्यात वाचवा. काय आहे प्रकरण? वाकड पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेली माहिती अशी की, शाळेला सुट्ट्या असल्याने मुलगा मागील काही दिवसांपासून घरातच होता. मात्र, शनिवारी त्याने आईजवळ बागेत खेळण्यास जाण्याचा हट्ट केला. तेव्हा त्याच्या आईने कोरोनाच्या भीतीने त्याला बाहेर जाण्यास मज्जाव करीत होती. त्यामुळे रागावलेल्या मुलाने दोरीच्या साहाय्याने गळफास लावून घेतला. त्यावेळी सुदैवाने दोर तुटली आणि मुलगा जमिनीवर कोसळला. मुलगा पडल्याचा आवाज ऐकून शेजारी राहणाऱ्या नातेवाईकांनी धाव घेत त्याला तत्काळ रुग्णालयात दाखल केले. सध्या मुलावर उपचार सुरु आहेत. या घटनेचा पोलिस पुढील तपास करणार असल्याचे मुगळीकर यांनी सांगितलं आहे. हेही वाचा...'माझ्या कुटुंबातील सदस्य घरात क्वारन्टाइन, मोदींच्या आवाहनाची खिल्ली उडवू नका' दरम्यान, कोरोनाचा संसर्ग झाल्याच्या संशयातून एका तरुणाने गर्भवती  महिलेला गळा आवळल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही महिला 6 महिन्यांची गर्भवती होती. दिल्लीत ही घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनाग्रस्त असल्याच्या संशयावरुन या तरुणाने गर्भवती महिलेला बेदम मारहाण केली. त्यानंतर आपल्या दोन्ही हाताच्या साहाय्याने तिचा गळा आवळला. काही काळ महिला स्वत:ला वाचवण्यासाठी प्रयत्न करीत राहिली. मात्र कालांतराने ती बेशुद्ध होऊन जमिनीवर कोसळली. हे वाचा - कंपनी मालकाने जपली सामाजिक बांधिलकी, मार्चमध्येच कर्मचाऱ्यांना एप्रिलचा पगार या तरुणावर महिलेला मारहाण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे प्रकरण फ्लोरिडा येथील आहे. 24 वर्षीय जॉन कॉरी या तरुणाला त्याच्या मजल्यावर राहणारी महिला कोरोनाबाधित असल्याचा संशय आला होता. त्यातून तरुणाने 17 मार्च रोजी महिलेसोबत दुर्व्यवहार केला. तत्सम महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. देशभरात कोरोनामुळे लोकांच्या मनात भीती आहे. त्यातूनही हा क्रुर प्रकार घडल्याचे सांगितले जात आहे. कोरोना हे जगावर घोंगावणारं संकट आहे. मात्र याला लढा देताना माणूसकी विसरू नये. सर्वांना एकत्र घेऊन कोरोनाशी दोन हात करणे अधिक सोपं जाईल, हे नागरिकांनी लक्षात ठेवायला हवं.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Pune news

पुढील बातम्या