मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

फक्त एका टी-शर्टच्या किमतीत मोदी सरकारला मिळणार कोरोना लस; सीरम इन्स्टिट्युटनं ठरवली किंमत

फक्त एका टी-शर्टच्या किमतीत मोदी सरकारला मिळणार कोरोना लस; सीरम इन्स्टिट्युटनं ठरवली किंमत

सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने (Serum institute ) कोविड -19 लस कोविशिल्डच्या (Covishield Vaccine ) आपत्कालीन वापराकरिता औपचारिक मान्यता मिळवण्यासाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (DCGI) अर्ज केला असून, असा अर्ज करणारी ती पहिली स्वदेशी कंपनी आहे.

पुढे वाचा ...

पुणे, 08 डिसेंबर : भारतात काही आठवड्यात कोरोना लस (corona vaccine) उपलब्ध होणार आहे. पुण्यातील सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियानं (pune serum institute of india) आपल्या कोरोना लशीच्या आपत्कालीन वापरासाठी केंद्र सरकारकडे अर्ज केला आहे. दरम्यान आता या लशीच्या किमतीबाबतही कंपनीनं निर्णय घेतल्याची माहिती समोर येते आहे. अवघ्या 250 रुपयात कोव्हिड 19 लस मिळण्याची शक्यता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

सीरमच्या पुण्यातील उत्पादन केंद्रात ऑक्सफर्ड- अ‍ॅस्ट्राझेनेका यांनी विकसित केलेल्या कोविशिल्ड लशीचं उत्पादन करण्यात येत आहे. खासगी बाजारात या लशीच्या एका डोसची किंमत 1000 रुपये असेल असं याआधी सीरमचे सीईओ अदार पूनावाला यांनी सांगितलं होतं. दरम्यान केंद्र सरकारला लशीचा एक डोस 250 रुपये दरानं मिळणार आहे. सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया (SII) लवकरच भारत सरकारबरोबर प्रतिडोस 250 रुपये दराने कोव्हिड 19 लशीचा पुरवठा करण्याचा करार करण्याची शक्यता आहे. बिझनेस स्टँडर्डनं दिलेल्या वृत्तानुसार, याबाबतीतली चर्चा अंतिम टप्प्यात असल्याची पुष्टी विश्वासार्ह सूत्रांनी केली आहे.

सीरम मोठ्या प्रमाणात लस पुरवू शकेल अशी आशा केंद्र सरकारला आहे. अर्थात किती डोस पुरवठ्याचा हा करार असेल, याबाबत निश्चित माहिती नाही. मात्र 6 कोटी डोस लवकरच उपलब्ध होण्याची शक्यता असल्याचं सूत्रांनी म्हटलं आहे. जानेवारी-फेब्रुवारीपर्यंत दहा कोटी डोस उपलब्ध होण्याची अपेक्षा आहे.

90 वर्षांच्या आजींनी घेतली जगातील पहिली कोरोना लस; वाढदिवसाआधी मिळालं मोठं गिफ्ट

सीरम इन्स्टिट्युट ऑफ इंडियाने (Serum institute ) कोविड -19 लस कोविशिल्डच्या (Covishield Vaccine ) आपत्कालीन वापराकरिता औपचारिक मान्यता मिळवण्यासाठी ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (DCGI) अर्ज केला असून, असा अर्ज करणारी ती पहिली स्वदेशी कंपनी आहे. भारतात प्राधान्यक्रमाने लस देण्यासाठी तयार करण्यात आलेल्या यादीत 3 कोटी लोकांचा समावेश आहे. त्यामुळं सरकारला पहिल्या टप्प्यात किमान 6 कोटी डोसची गरज आहे. जुलैपर्यंत पहिल्या टप्प्यातील लशीकरण चालण्याची शक्यता आहे.

जानेवारीपर्यंत 20 कोटी डोस निर्माण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे. अ‍ॅस्ट्राझेनेकाबरोबर करार झाला असून त्यामुळे कोविशिल्डचे किमान 10 कोटी डोस जानेवारीपर्यंत उपलब्ध होतील आणि शेकडो दशलक्ष डोस फेब्रुवारीच्या अखेरीस तयार करता येतील, असंही सीरमचे सीईओ अदर पूनावाला (Adar Poonawala) यांनी म्हटलं आहे. आगामी दोन वर्षांत सीरम 3.2 अब्ज डोसचा पुरवठा करणार आहे. त्यापैकी 50 कोटी डोस अ‍ॅस्ट्राझेनेकाचे असतील, जे भारताला पुरवण्यात येणार आहेत, असं सूत्रांनी सांगितलं. इतर कोणत्याही देशांना लस पुरवण्याआधी भारतीयांना ती देण्याला सीरम प्राधान्य देईल, असंही पूनावाला यांनी स्पष्ट केलं आहे.

बॉलिवूडला कोरोनाचा विळखा: आणखी एक अभिनेत्री कोरोना पॉझिटिव्ह

भारतात आतापर्यंत 97 लाख लोकांना कोविड 19ची लागण झाली आहे. जगात सर्वाधिक कोविड 19 चे रुग्ण असणारा भारत हा दुसरा देश आहे. अमेरिकेत सर्वांत जास्त रुग्ण आहेत. या पार्श्वभूमीवर तातडीच्या वापरासाठी मान्यता मिळावी याकरता फायझर आणि अॅस्ट्राझेनेका यांच्या लशींच्या चाचण्या गतिमान करण्यात येत आहेत, असं एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितलं.

First published: