मराठी बातम्या /बातम्या /पुणे /हृदयद्रावक! कोरोनानं घेतला तरुण भावंडांचा घास, बहिणीच्या दशक्रियेदिवशीच भावाचाही मृत्यू

हृदयद्रावक! कोरोनानं घेतला तरुण भावंडांचा घास, बहिणीच्या दशक्रियेदिवशीच भावाचाही मृत्यू

Corona Outbreak: कोरोनामुळे बहिणीचा मृत्यू झाल्यानंतर तिच्या दशक्रियेदिवशीच भावालाही कोरोनानं हिरावलं आहे. ऐन तिशीत असणाऱ्या बहिण-भावाचा मृत्यू (Sister and brothers death) झाल्यानं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

आंबेगाव, 30 मे: मागील काही दिवसांपासून देशात कोरोना विषाणूचा संसर्ग (Corona pandemic) वाढतच चालला आहे. कोरोना विषाणूची दुसरी लाट (Corona Virus 2nd wave) अत्यंत घातक ठरत असून कुटुंबच्या कुटुंबे कोरोनाच्या विळख्यात सापडत आहेत. दरम्यानच्या काळात एकाच घरातील एकाहून अधिक सदस्यांचा कोरोनामुळे मृत्यू (Corona patients death) होण्याचं प्रमाण वाढलं आहे. दुसऱ्या लाटेत अनेकांनी आपली जीवाभावाची माणसं गमावली आहेत. अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना आंबेगाव तालुक्यातील अवसरी याठिकाणी घडली आहे. येथील एका मुलीचा कोरोनामुळे मृत्यू झाल्यानंतर तिच्या दशक्रियेदिवशीच भावाचाही मृत्यू झाला आहे. ऐन तिशीत बहिण-भावाचा मृत्यू (Sister and brothers death) झाल्यानं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

माधवी बाळासाहेब हिंगे पाटील (वय-31) आणि मयूर बाळासाहेब हिंगे पाटील (वय-29) असं मृत पावलेल्या भावंडाची नावं आहेत. 15 दिवसांपूर्वी माधवी आणि मयूरसह त्यांच्या आई वडिलांना कोरोना विषाणूची लागण झाली होती. एकाच कुटुंबातील चार जणांना कोरोनाची बाधा झाल्याने नातेवाईक चिंतेत होते. पण सर्वजण सुखरूप परततील असा त्यांना विश्वास होता. काही दिवसांतचं आई आणि वडिलांनी कोरोनावर मात केली. पण दुसरीकडे माधवी आणि मयूरची प्रकृती खालावत गेली. त्यामुळे त्यांना पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

याठिकाणी उपचार सुरू असताना माधवीचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे हिंगे पाटील कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यांनी माधवीचा मृतदेह गावी नेवून तिच्यावर अंत्यसंस्कार केले. दुसरीकडे मयूर आपली कोरोना सोबतची लढाई लढतचं होता. मुलीच्या विरहाचे अश्रू अजून पुसलेही नव्हते, तोपर्यंत हिंगे कुटुंबीयांवर कोरोना विषाणूने दुसरा घात केला. ऑक्सिजन पातळी कमी झाल्यानं बरोबर बहिणीच्या दशक्रियेदिवशीचं भावाचाही कोरोनामुळे मृत्यू झाला.

हे ही वाचा-गेल्या 24 तासांत राज्यातील रुग्णसंख्येत मोठी घट; मृत्यूचा आकडा मात्र चिंताजनक

अवघ्या दहा दिवसांत ऐन तिशीत असलेल्या या बहिण भावाचा एकाकी मृत्यू झाल्यानं गावात शोककळा पसरली होती. दोघंही बहिण-भाऊ उच्च शिक्षित होते. दोघांच्या मृत्यूमुळे कुटुंबीयांना अजून त्यांचे अश्रू आवरता येत नाहीयेत.

First published:

Tags: Corona patient, Death, Pune