मोठी बातमी! पुण्यात corona स्थिती अवाक्याबाहेर; PMC ने लष्कराकडे मागितली मदत

मोठी बातमी! पुण्यात corona स्थिती अवाक्याबाहेर; PMC ने लष्कराकडे मागितली मदत

Corona Cases in Pune: पुण्यातील खाजगी आणि सरकारी रुग्णालयात सध्या मोठ्या प्रमाणात बेड आणि व्हेंटिलेटरची कमरता (lack of bed and Ventilator) जाणवनत आहे. त्यामुळे कोरोना स्थिती अवाक्याबाहेर जात असल्याचं पाहून पुणे महानगरपालिकेनं भारतीय लष्कराकडे मदत मागितली आहे.

  • Share this:

पुणे, 07 एप्रिल: देशात कोरोना विषाणूची (Corona virus in India) स्थिती भयावह बनत चालली आहे. देशात दररोज एक लाखाहून अधिक कोरोना रुग्णांची (Corona Cases) वाढ होतं आहे. यामध्ये सर्वाधिक कोरोना रुग्ण हे महाराष्ट्रात नोंदले जात आहेत. यातही मुंबई, पुणे आणि नागपुरात कोरोना स्थिती हाताबाहेर जाताना दिसत आहे. तर पुण्यात कोरोना रुग्णांना उपचारासाठी बेड मिळणंही कठिण बनत चाललं आहे. पुण्यात आयसीयू आणि व्हेटिलेटर बेडचा तुटवडा मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. त्यामुळे आता पुणे महानगरपालिकेनं मदतीसाठी लष्कराला साकडं घातलं आहे.

पुणे महानगरपालिका हद्दीमध्ये कोरोनावरील रुग्णांवर उपचार करण्यासाठी पुण्यात जवळपास 21 हजारांहून अधिक बेड उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पण यातील बहुतांशी बेडला व्हेंटिलेटरची सुविधा नाही. पुण्यात 489 बेडला व्हेटिलेटरची सुविधा उपलब्ध आहे. सोमवारी सायंकाळची स्थिती पाहता यापैकी एकही व्हेंटिलेटर बेड उपलब्ध नसल्याचं समोर आलं होतं. मंगळवारी रात्री उशिरानंतर काही बेड उपलब्ध झाले. पण पुण्यात रुग्णांची मोठ्या प्रमाणात हेळसांड होताना दिसत आहे.

(हे वाचा-News18 लोकमतचा Impact! पुण्यात आणखी 10 व्हेंटिलेटर बेड वाढवणार)

पुण्यातील खाजगी आणि सरकारी रुग्णालयात सध्या मोठ्या प्रमाणात बेड आणि व्हेंटिलेटरची कमरता (lack of bed and Ventilator) जाणवनत आहे. त्यामुळे कोरोना स्थिती अवाक्याबाहेर जात असल्याचं पाहून पुणे महानगरपालिकेनं भारतीय लष्कराकडे मदत मागितली आहे. पुण्यात भारतीय लष्कराचं एक मोठं रुग्णालय आहे. या लष्करी रुग्णालयात 335 बेड  आणि 15 व्हेंटीलेटरची अद्ययावत सुविधा आहे. त्यामुळे या ठिकाणी कोरोना रुग्णावर उपचार करण्यासाठी पुणे महानगरपालिकेनं लष्कराकडे मदत मागितली आहे.

(हे वाचा- 'वैकुंठ' मिळेना! पुण्याच्या स्मशानभूमीत कोरोनाग्रस्तांवर अंत्यसंस्कार नाहीत)

लष्करी रुग्णालयाकडून मदत मिळण्याची आशा पुणे महानगर पालिकेनं व्यक्त केली आहे. परंतु या मागणीबाबत अद्याप लष्करी रुग्णालयाकडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही.

Published by: News18 Desk
First published: April 7, 2021, 12:47 PM IST

ताज्या बातम्या