मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

Pune: ससूनमधील 40 टक्के Corona बाधित नगर जिल्ह्यातील, बाधित गावात कठोर नियम लावण्याच्या सूचना

Pune: ससूनमधील 40 टक्के Corona बाधित नगर जिल्ह्यातील, बाधित गावात कठोर नियम लावण्याच्या सूचना

पुण्यात कोरोनाची साथ नियंत्रणात मात्र शेजारील जिल्ह्याने वाढवली चिंता (प्रातिनिधिक फोटो)

पुण्यात कोरोनाची साथ नियंत्रणात मात्र शेजारील जिल्ह्याने वाढवली चिंता (प्रातिनिधिक फोटो)

Pune coronavirus updates: 30 सप्टेंबर 2021 च्या आकडेवारीनुसार पुणे महानगरपालिकेत 185 नव्या रुग्णांची नोंद झाली.

  • Published by:  Sunil Desale

पुणे, 1 ऑक्टोबर : राज्यातील बहुतांश जिल्ह्यात कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव आता अत्यल्प आहे. पुण्यातील कोरोनाची स्थितीही नियंत्रणात (Covid situation under control in Pune) आहे. मात्र, त्याचवेळी पुण्याच्या शेजारील अहमदनगर जिल्ह्याने (Ahmednagar district) चिंता वाढवली आहे. कारण, अहमदनगर जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कायम असल्याचं दिसत आहे. कोरोना स्थितीचा आढावा घेणारी बैठक पुण्यात पार पडल्यावर पालकमंत्री अजित पवार (Dycm Ajit Pawar) यांनी पुणे आणि अहमदनगरमधील कोरोनाच्या स्थितीची माहिती दिली.

दुसरा डोस घेतलेले रिलॅक्स झालेत, हे योग्य नाही

राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी म्हटलं, पुणे जिल्ह्यात कोरोना साथ नियंत्रणात आहे. पहिला डोस घेतलेल्या 0.19 टक्के संसर्ग तर 2 डोसवाल्यांना 0.25 संसर्ग होतोय. याचा अर्थ दोन डोस वाले थोडे रिलँक्स दिसतायेत.... हे योग्य नाही. लस घेतली तर नियम पाळलेच पाहिजेत. गेल्या आठवड्यात 5 लाख नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे.

40 टक्के रुग्ण अहमदनगर जिल्ह्यातील

ससूनमध्ये 40 टक्के पेशंट हे नगर जिल्ह्यातील आहेत. नगर जिल्ह्यात पारनेर आणि संगमनेर तालुक्यात अजूनही कोरोना प्रादुर्भाव कायम दिसतोय. बाधित गावात कठोर नियम लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्रामीण भागात फक्त एक कोविड रूग्णलाय ठेवा बाकीचे नॉनकोविड करा असंही सांगितलं आहे. लसीकरणात सिरींजचा तुटवडा जानवतोय ही गोष्ट खरी आहे. ग्रामीण भागासाठी सरकार सिरींज देणार आहे. यापुढे पालिकांनी स्वत: सिरींज खरेदी कराव्यात अशा सूचना राज्य सरकारने यापूर्वीच दिल्या आहेत.

पुण्याचा तरुण 48 तासांनी आढळला अहमदनगरमध्ये; अवस्था पाहून कुटुंब हादरले!

75 तासांची लसीकरण मोहीम 

स्वातंत्र्याचा अमृतमोहत्सव संपूर्ण देशभरात वेगवेगळ्या पद्धतीने उद्या साजरा केला जात आहे. याच पार्श्वभूमीवर संपूर्ण तीन दिवस आणि तीन तास असे 75 तासांचा कार्यक्रम हाती घेतला आहे. आजादी का अमृत महोत्सव लसीकरण करून साजरा करतोय.

अजित पवार पुढे म्हणाले, शाळा सुरू होत आहेत. शाळांमधून कोविड प्रोटोकॉल पाळलाच गेला पाहिजे. या संदर्भात विद्यार्थ्यांना मार्गदर्शक सूचनांची माहिती सातत्याने द्यावी जेणेकरुन विद्यार्थी योग्य ती काळजी घेतील. पालकांची अजून मुलं शाळेत पाठवण्याची मानसिकता दिसत नाही असं प्रशासनाने निदर्शनात आणून दिलंय. लहान मुलांच्या लसीकरणाची परवानगी केंद्र सरकारने दिली तरच निर्णय घेऊ असंही अजित पवार म्हणाले.

लहान मुलांसाठी चांगली बातमी; पुण्यात Covovax ची ट्रायल सुरु, 7-11 वयोगटातील मुलं होणार सहभागी

पुणे मनपातील कोरोनाची स्थिती

30 सप्टेंबर 2021 च्या आकडेवारीनुसार पुणे महानगरपालिकेत 185 नव्या रुग्णांची नोंद झाली. 138 रुग्णांनी कोरोनावर मात केली. तर दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 9029 इतकी झाली आहे. सध्यस्थितीत पुण्यात एकूण 1487 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

First published:

Tags: Ahmednagar, Ajit pawar, Coronavirus, Pune