Home /News /pune /

पुण्यासाठी वाईट बातमी! कोरोनाने घेतला आणखी एक बळी

पुण्यासाठी वाईट बातमी! कोरोनाने घेतला आणखी एक बळी

पुण्यात कोरोनाच्या साथीने घेतलेला हा दुसरा बळी आहे.

पुणे, 2 एप्रिल : पुण्यात Coronavirus ने आणखी एक बळी घेतला आहे. पुण्याच्या ससून रुग्णालयात दाखल असणाऱ्या एका 50 वर्षाच्या महिलेचा कोरोनाव्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. या महिलेला न्यूमोनियाही झाली होता. तिची Covid-19 ची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. पुण्यात कोरोनाच्या साथीने घेतलेला हा दुसरा बळी आहे. ही महिला कालच ससूनमध्ये भरती झाल्याचं समजतं. तिला श्वास घ्यायला त्रास होत होता आणि न्यूमोनिया गंभीर अवस्थेत पोहोचलेला होता. कोविड-19 च्या चाचणीचा अहवाल आज आला आणि त्यात ही महिला कोरोनाबाधित असल्याचं स्पष्ट झालं. गुरुवारी पुणे परिसरात 9 नवे रुग्ण सापडले. त्यातले पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात 3 कोरोनाबाधित दाखल झाले, तर पुण्यात 6 कोरोनाग्रस्त दाखल झाले आहेत. बापरे! ‘तबलिगी जमात’मुळे तब्बल 400 जणांना कोरोना, देशभर पडला विळखा राज्यभरात 81 नवे रुग्ण दाखल झाले. यातले सर्वाधिक रुग्ण मुंबईत सापडले आहेत. मुंबईत 8 तासांत 62 नवे रुग्ण आढळले तर 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तीन दिवसांपूर्वी पुण्यात कोरोनाव्हायरसमुळे पहिला बळी गेला होता. राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या आज 416 पर्यंत पोहोचली आहे. गेल्या 24 तासांत राज्यात 81 रुग्ण कोरोनाग्रस्त सापडले. देशात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत आहे. मरकज जमात प्रकरणानंतर रूग्णांची संख्या वाढली असून कोरोना रूग्णांची संख्या 2069 एवढी झाली आहे. तर आत्तापर्यंत 53 जणांचा मृत्यू झालाय. पुढच्या काही दिवसांमध्ये ही संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. Coronavirus च्या निदानासाठी लवकरच ब्लड टेस्ट, भारतातील रुग्णांचा खरा आकडा समजणार देशात कोरोनाचा विळखा आणखी घट्ट होत आहे. मरकज जमात प्रकरणानंतर रूग्णांची संख्या वाढली असून कोरोना रूग्णांची संख्या 2069 एवढी झाली आहे. तर आत्तापर्यंत 53 जणांचा मृत्यू झालाय. पुढच्या काही दिवसांमध्ये ही संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
Published by:Manoj Khandekar
First published:

Tags: Corona, Pune news

पुढील बातम्या