मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

‘कोरोना’चा धसका, परदेशात गेलेल्यांना 3 हजार सोसायट्यांची दारं होणार बंद?

‘कोरोना’चा धसका, परदेशात गेलेल्यांना 3 हजार सोसायट्यांची दारं होणार बंद?

प्रातिनिधक फोटो

प्रातिनिधक फोटो

एकच सोसायटी नाही तर या शहरातील सुमारे साडे तीन हजार सोसायट्याचा समावेश असलेल्या महासंघानेही अशीच भूमिका घेण्याचे संकेत दिले आहेत.

पिंपरी चिंचवड 12 मार्च :परदेशात गेलेल्या आणि परत येणाऱ्या नागरिकांना सोसायटीमध्ये थेट प्रवेश द्यावा की नाही या बाबत पिंपरी चिंचवड मधील एका सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी थेट पोलिसांकडे धाव घेतली. त्यामुळे  नागरिकांमध्ये कोरोनाची धास्ती दिवसेंदिवस वाढत चालली असून त्यातून नवे वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झालीय. पिंपरी चिंचवड शहरातील उच्चभ्रू परिसरात असलेल्या द्वारका फ्लोरा रेसिडन्सी सोसायटी मधील नागरिकांवर कोरोनाची एव्हढी धास्ती बसलीय की त्यांनी आपल्या सोसायटीमधील जे सदस्य बाहेर देशात गेलेले आहेत ते परत आल्यावर त्यांना प्रवेश द्यायचा की नाही या बाबत पोलिसांकडे विचारणा केल्याने एकच खळबळ उडालीय, कोरोनाची लागण झाली असेल तर त्याची लक्षण लगेच कळत नाहीत अशा परिस्थितीत बाहेर देशातून आलेला कोणताही व्यक्ती सोसायटी मध्ये कसा घ्यायचा असा त्यांचा प्रश्न द्वारका फ्लोरा रेसिडन्सीचे अध्यक्ष शैलेश राजे यांनी केलाय.

कोरोनाच्या भीतीमुळे पिंपरी चिंचवड मधील अशी भूमिका मांडणारी केवळ  ही एकच सोसायटी नाही तर या शहरातील सुमारे साडे तीन हजार सोसायट्याचा समावेश असलेल्या महासंघानेही अशीच भूमिका घेत यापुढे कोणत्याही इतर देशातुन येणाऱ्या नागरिकाला सोसायटीमध्ये प्रवेश करायचा असल्यास त्याने तो कोरोना बाधित नसल्याचं प्रमाणपत्र दाखविणे बंधनकारक करणार असल्याचं म्हटलंय.

शेतात काम करून झाले MBBS, भावंडानांही शिकवलं; खडसेंवर मात करणारे असे आहेत कराड

तर या प्रकारामुळे भविष्यात वाद वाढू नये यासाठी सर्व यंत्रणांनी आत्ताच सोसायटी धारकांसाठी नियमावली करून दयावी अशी मागणीही त्यांनी केलीय मात्र कोणत्याही व्यक्तीला त्याच्या घरात जाण्यापासून रोखन हे कृत्य बेकादयदेशीर असल्याचं नागरिकांनी अस कृत्य करू नये असं आव्हान पोलिसांनी केलं आहे.

‘मध्यप्रदेशातला सत्तेचा ‘व्हायरस’ महाराष्ट्रात येणार, महाआघाडीचं सरकार जाणार’

एकीकडे कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि तेव्हढयाच झपाट्याने पसरणाऱ्या अफवा यामुळे नागरिकांमध्ये अनेक संभ्रम निर्माण झाले आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखला जावा त्यासाठी उपाय योजना करणं योग्यच पण त्यातून कुणावर बहिष्कार टाकला जाण्यासारख्या घटना घडू लागल्या तर प्रशासनापुढे नवं संटक निर्माण होईल त्यामुळे असे प्रकार टाळावेत असं मत समाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं आहे.

First published:

Tags: Corona, Corona virus in india