बारामतीची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु असताना आढळला कोरोनाबाधित रुग्ण

बारामतीची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु असताना आढळला कोरोनाबाधित रुग्ण

बारामती शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु असताना एका 66 वर्षीय वृद्धास कोरोनाचा संसर्ग झाला आहे.

  • Share this:

बारामती, 24 एप्रिल: बारामती शहराची कोरोनामुक्तीकडे वाटचाल सुरु असताना एका 66 वर्षीय वृद्धास कोरोनाचा संसर्ग झाला आहे. वृद्धास पुण्यात उपचारासाठी नेले होते. यादरम्यान त्याला कोरोनाची लागन झाल्याचे निष्पन्न झाले आहे. दपम्यान, कोरोनाबाधित चार रुग्णांचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्यांना शुक्रवारी डिस्चार्ज देण्यात आला.

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी बारामती शहरात कडक अंमलबजावणी करण्यात आली आहे. कालच (गुरुवार) केंद्रीय समितीचे पथकाने बारामतीत येऊन कटेंनमेंट एरियात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. केंद्रीय समितीने बारामती पॅटर्नचं कौतुक केलं होतं. मात्र, तालुक्यातील माळेगाव सहकारी साखर कारखान्याजवळ राहात असणाऱ्या 66 वर्षीय वृद्धास किडनी फेल्युअरमुळे उपचारासाठी पुण्यातील एका खासगी हॉस्पिटलत दाखल करण्यात आलं होतं. या पेशंटला वारंवार डायलिसिस करावं लागत होतं. त्यामुळे हा रुग्ण पुण्यातच उपचार घेत होता.

हेही वाचा...मुंबईत माहेरी राहून भिवंडीत सासरी आलेल्या आईसह दोन मुलांना कोरोनाची लागण

चार दिवसांपूर्वी या रुग्णाला जनरल वॉर्डमध्ये शिफ्ट करण्यात आलं होतं. परवा रात्री म्हणजेच बुधवारी या रुग्णाला घशात त्रास जाणवत होता. त्यामुळे या रुग्णाची कोरोना टेस्ट घेण्यात आली होती. आता या रुग्णाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी डॉ.मनोज खोमणे यांनी सांगितले. आता या रुग्णाच्या मुलीची देखील तपासणी करण्यात येणार आहे.

बारामती शहर व परिसरात प्रशासनाने कडक अंमलबजावणी केल्याने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी यश मिळत आहे. मात्र, आता बारामतीत बाहेरगावाहून आलेल्या नागरिकांनपासून किंवा शहरातून बाहेरगावी गेलेल्यांना धोका आहे. त्यामुळे कुठल्याही नागरीकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

बारामतीकरांच्या सेवेसाठी सदैव तत्पर म्हणून प्रातांधिकारी दादासाहेब कांबळे, उपविभागीय पोलिस अधिकारी नारायण शिरगावकर, पोलीस निरीक्षक औदुंबर पाटील व त्यांचा स्टाफ हजर आहे.

हेही वाचा..कोरोनाच्या लढ्यात या मुख्यमंत्र्यांची रुग्णसेवा;वाढदिवशी बजावलं डॉक्टरचं कर्तव्य

संपादन- संदीप पारोळेकर

First published: April 24, 2020, 7:00 PM IST

ताज्या बातम्या