मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पिंपरी चिंचवडकरांसाठी दिलासा, कोरोनासंदर्भात समोर आला मोठा अहवाल

पिंपरी चिंचवडकरांसाठी दिलासा, कोरोनासंदर्भात समोर आला मोठा अहवाल

पुण्यात पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ही 57523 एवढी झाली आहे. तर 18040 जण सक्रिय रुग्ण आहेत.

पुण्यात पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ही 57523 एवढी झाली आहे. तर 18040 जण सक्रिय रुग्ण आहेत.

पुण्यात करोना बाधित रुग्णांची संख्या 16वर पोहोचली आहे. यातील पुण्यात 7 तर पिंपरी चिंचवडमध्ये 9 रुग्ण आहेत.

पुणे, 16 मार्च : कोरोना व्हायरस पुण्यात पोहोचल्यापासून पुणेकरांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पण आता पिंपरीमधून कोरोनासंदर्भात एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये तब्बल 278 रुग्णांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. सर्व रुग्ण ठणठणीत असल्याची माहिती डॉक्टरांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे पुणेकरांनी कोणतीही भीती न बाळगता आरोग्याची काळजी घेण्याचं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. पुण्यात करोना बाधित रुग्णांची संख्या 16वर पोहोचली आहे. यातील पुण्यात 7 तर पिंपरी चिंचवडमध्ये 9 रुग्ण आहेत. 278 कोरोना संशयितांनी चाचण्या केल्या होत्या पण त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ही आल्याचं डॉक्टरांकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे कोणत्याही अफवांना बळी न पडता आपल्या आरोग्याची काळजी घ्या. कोरोना हा जीवघेणा आजार नसून त्याच्या उपचार केल्यानंतर तो बरा होईल अशा सुचना प्रशासन आणि आरोग्य विभागाकडून देण्यात आल्या आहेत. तर सुरक्षेसाठी आजपासून 3 दिवस प्रसिद्ध तुळशीबाग परिसरातील दुकाने बंद राहणार आहे. सर्व व्यापाऱ्यांनी हा उत्स्फूर्त निर्णय घेतला आहे. पुण्यात काही ठिकाणी संचारबंदी लागू करा (200 ते 500।मीटर ) असा पालिका आयुक्तांचा कलेक्टर।यांच्याकडे प्रस्तावही देण्यात आला आहे. त्यावर काय निर्णय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. संबंधित बातमी - असं काय झालं की रिपोर्ट येण्याआधीच कोल्हापूरमध्ये झाला कोरोना संशयिताचा मृत्यू विद्यार्थ्यांंना सुट्टी मात्र शिक्षकांना काम दरम्यान, पुणे पालिका आजपासून घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणार आहे. शाळा ,कॉलेज बंद असल्या तरी परीक्षा वेळापत्रकानुसार होणार असून अनेक महाविद्यालयात परीक्षा सुरू आहेत. पुणे विद्यापीठाच्या परीक्षाही वेळापत्रकानुसार होणार आहे. अनेक कॉलेजात शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कॉलेजात जावे लागत असल्यानं नाराजी आहे. MPSC च्या परीक्षा 31 मार्चपर्यंत स्थगित।करण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र काल 15 मार्चला परीक्षा झाली आणि आता 5 एप्रिलला परीक्षा होणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. काल रात्री पिंपरी चिंचवड येथील 5 आणि आज सकाळी औरंगाबाद येथील 1 रुग्ण कोरोनाबाधित आला. तसंच सायंकाळी पिंपरी चिंचवडमधीलही एका रुग्णाला कोरोनाची बाधा झाल्याने राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या 33 झाली असून औरंगाबाद मधील रुग्णालयात भरती असलेल्या 59 वर्षीय महिलेने रशिया आणि कझाकिस्तान येथे प्रवास केलेला आहे. तिची प्रकृती स्थिर आहे. राज्यात आज 95 संशयित रुग्णांना भरती करण्यात आले आहे. 15 मार्चपर्यंत मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर 1 हजार 584 विमानांमधील 1 लाख 81 हजार 925 प्रवासी तपासण्यात आले आहेत. हे वाचा - ...म्हणून शंशाक केतकर-तेजश्री प्रधाननं लग्नानंतर वर्षभरातच घेतला घटस्फोट राज्यात आजपर्यंत बाधित भागातून एकुण 1043 प्रवासी आले आहेत. 18 जानेवारीपासून ताप, सर्दी, खोकला अशी लक्षणे आढळल्याने राज्यातील वेगवेगळ्या विलगीकरण कक्षात आजपर्यंत 759 जणांना भरती करण्यात आले आहे. आजपर्यंत भरती करण्यात आलेल्यापैकी 669 जणांचे प्रयोगशाळा नमुने करोना करता निगेटिव्ह आले आहेत तर 33 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यातील विविध विलगीकरण कक्षामध्ये 75 संशयित रुग्ण भरती आहेत. राज्यातील जिल्हा व मनपानिहाय कोरोनाबाधित रुग्णांचा तपशील असा – पिंपरी चिंचवड मनपा - 9 रूग्ण, पुणे - 7, मुंबई - 5, नागपूर - 4, यवतमाळ - 2, रायगड, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, औरंगाबाद, अहमदनगर प्रत्येकी एक असे एकूण 33 रूग्ण आहेत.
First published:

Tags: Corona, Corona virus in india, Coronavirus, Coronavirus symptoms

पुढील बातम्या