Home /News /pune /

पुण्यात Corona ची परिस्थिती खतरनाक, राज्यापेक्षा दुप्पट पॉझिटिव्हीटी दर

पुण्यात Corona ची परिस्थिती खतरनाक, राज्यापेक्षा दुप्पट पॉझिटिव्हीटी दर

Corona Virus In Pune: पुण्यातून (Pune Corona Virus) कोरोनासंदर्भातली मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातील सकारात्मकता दर भयावह करणारा आहे.

    पुणे, 27 जानेवारी: महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा (Corona Virus) धुमाकूळ पाहायला मिळतोय. दिवसेंदिवस राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यातच पुण्यातून (Pune Corona Virus) कोरोनासंदर्भातली मोठी बातमी समोर येत आहे. पुण्यातील सकारात्मकता दर भयावह करणारा आहे. महाराष्ट्रात उच्च जोखीम असलेल्या शहरांमध्ये कोविडची साप्ताहिक सकारात्मकता दरातून (Positivity Rate) समोर आलं आहे की, पुण्यात मुंबई, (Mumbai) ठाणे (Thane) , वर्धा, अकोला आणि नाशिकच्या (Nashik) तुलनेत सर्वांत जास्त सकारात्मकता दर 49.9 टक्के आहे. म्हणजेच पुण्याचा साप्ताहिक सकारात्मकता दर 49.9 टक्के आहे. हा दर गेल्या आठवड्यात नोंदवलेल्या राज्याच्या सरासरी 24 टक्क्यांच्या दुप्पट आहे. महाराष्ट्रातील (Covid-19 cases in Maharashtra) कोविड-19 प्रकरणांबाबत देशात चिंतेचे वातावरण आहे. सरकारी आकडेवारीनुसार, 17 ते 24 जानेवारी दरम्यान झालेल्या RT-PCR चाचणीद्वारे एकूण 84,902 लोकांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्याच वेळी, रॅपिड अँटीजेन टेस्ट (RAT) तसेच RT-PCR साठी एकूण 2.22 लाख नमुने तपासण्यात आले, ज्यामध्ये 97,838 लोक पॉझिटिव्ह आढळले. यामध्ये साप्ताहिक सकारात्मकता दर जो गेल्या सात दिवसांची सरासरी आहे, हे दर्शविते की कोरोना व्हायरस खूप वेगानं पसरत आहे. लवकरच  Covishield आणि Covaxin बाजारात विक्रीसाठी, जाणून घ्या किती असेल किंमत पीएमसीचे सहाय्यक आरोग्य प्रमुख डॉ. संजीव वावरे म्हणाले की, पुणे शहरातील कोरोनाचे प्रमाण चिंताजनक स्थितीत पोहोचले आहे. हे थांबवण्यासाठी तातडीने कठोर पावले उचलण्याची गरज आहे. त्याच वेळी, तज्ज्ञांनी या दराचं पीक पीरियड म्हणून वर्णन केले आहे. ओमायक्रॉनमुळेच हे घडत असून, येत्या दहा दिवसांपर्यंत हीच परिस्थिती राहू शकते, असे त्यांनी म्हटले आहे. या काळात लोकांनी खूप काळजी घ्यावी आणि घरातच राहावे. वावरे म्हणाले की, 10-15 दिवसांनी केसेस कमी होण्यास सुरुवात होईल, अशी आमची अपेक्षा आहे. मुंबईतही असाच ट्रेंड दिसून आला आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ भगवान पवार म्हणाले की, ओमायक्रॉन हा अतिसंसर्गजन्य स्ट्रेन देखील कम्‍युनिटी स्‍प्रेड टप्प्यावर पोहोचला आहे. तपास वाढवला जात असताना, सकारात्मकतेचा दर अजूनही खूप जास्त आहे. ते म्हणाले की, आम्ही 10-15 दिवस मुंबईच्या मागे आहोत, पुढच्या आठवड्यात इथेही केसेस कमी होतील. खूप कमी रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत केसेसच्या संख्येबद्दल घाबरण्याची गरज नाही. लोकांनी कोविड प्रोटोकॉलचे पालन करावे. मुंबईकरांना मोठा दिलासा, कोरोनाबाधितांचा आकडा कमी झाला अखेर तीन आठवड्यांनी मुंबईकरांना काहीसा दिलासा मिळताना दिसतोय. कारण दैनंदिक रुग्णवाढ ही 20 हजारांच्या पार गेली असताना हळूहळू ही आकडेवारी नियंत्रणात आणण्यात प्रशासनाला यश मिळताना दिसत आहे. मुंबईत काल दिवसभरात 1 हजार 858 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. तर 1 हजार 656 बाधितांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत रुग्ण बरे होण्याचा दर हा 96 टक्क्यांवर पोहोचलं आहे. तर रुग्ण दुप्पटीचा दर हा 185 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबई महापालिकेच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, 19 जानेवारी ते 25 जानेवारी या दरम्यान कोरोना संसर्ग वाढीचा दर 0.37 टक्के इतका आहे. IND vs WI : पांड्याशी झालेल्या पंग्यानं बदललं आयुष्य, रोहित-द्रविडनं दिली संधी मुंबईतील नव्या कोरोनाबाधित रुग्णांच्या आकडेवारीचा अभ्यास केला तर 15 जानेवारीला 10 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद झाली होती. त्यानंतर हळूहळू ही रुग्णसंख्या दररोज कमी झाली. 15 जानेवारीनंतर दुसऱ्याच दिवशी नव्या बाधितांच्या आकडेवारीत 2 हजारांपेक्षा जास्त रुग्णांची कमी झाल्याचं बघायला मिळालं होतं. रुग्णांची कमी संख्या ही दररोज दोन हजारांच्या फरकाने कमी होऊ लागली होती. 21 जानेवारीला 5008 रुग्ण आढळले होते. त्यानंतर 22 जानेवारीला हाच आकडा 3568 वर पोहोचला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी ही आकडेवारी आणखी एक हजाराने खाली घसरली होती. मात्र, गेल्या दिवसांपासूनची आकडेवारी ही 1800 ते 1850 च्या दरम्यान बघायला मिळत आहे. ही आकडेवारी देखील लवकरच खाली घसरेल आणि मुंबईत कोरोना परिस्थिती पूर्णपणे सुधारेल, अशी आशा आहे.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Coronavirus, Pune

    पुढील बातम्या