मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्यात कोरोनाने ओलांडली धोक्याची पातळी, धक्कादायक आकडेवारी समोर

पुण्यात कोरोनाने ओलांडली धोक्याची पातळी, धक्कादायक आकडेवारी समोर

देशभरातील ज्या शहरांतील कोरोना स्थितीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे, त्यामध्ये पुणे शहराचाही समावेश आहे. त्यातच शहरातील आरोग्य व्यवस्थेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. आता मात्र यामध्ये काहीसा बदल होणार आहे.

देशभरातील ज्या शहरांतील कोरोना स्थितीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे, त्यामध्ये पुणे शहराचाही समावेश आहे. त्यातच शहरातील आरोग्य व्यवस्थेबाबतही प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. आता मात्र यामध्ये काहीसा बदल होणार आहे.

पुणे शहरात कोरोनाबाधित 50 हजार रुग्णांची संख्या झाली आहे तर संपूर्ण जिल्ह्यात 75 हजारांचा टप्पा पार केला आहे.

पुणे, 29 जुलै : महाराष्ट्रात कोरोनाने थैमान घातले आहे. राज्याची राजधानी मुंबई पाठोपाठ पुण्यात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत भरमसाठ वाढ झाली आहे. पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांची संख्येनं आता 50 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. पुणे शहरात कोरोनाबाधित रुग्णांची गेल्या 24 तासातील आकडेवारी समोर आली आहे.  मंगळवारी दिवसभरात संपूर्ण जिल्ह्यात तब्बल 2618 कोरोना रूग्णांची वाढ झाली आहे. तर दुसरीकडे पिंपरी चिंचवड महापालिकेच्या हद्दीतही रुग्णांची मोठी वाढ झाली आहे. रुग्णांची संख्या तब्बल 1100 ने वाढली आहे. एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली तर दुसरीकडे मृतांची संख्याही पन्नासहून अधिक आहे. दिवसभरात 55 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत पुणे जिल्ह्यात 1792 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. पुणे शहरात कोरोनाबाधित 50 हजार रुग्णांची संख्या झाली आहे तर संपूर्ण जिल्ह्यात 75 हजारांचा टप्पा पार केला आहे. मुंबईनंतरही सर्वात मोठी रुग्ण संख्या आहे. पुण्यात आता 'ट्रेसिंग, टेस्टिंग आणि ट्रिटमेंट' दरम्यान, पुणे शहर व जिल्ह्यातील कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी यापुढच्या काळात संपूर्ण यंत्रणा एकाच सेंट्रल कमांडच्या निर्देशानुसार काम करेल. कन्टेन्मेंट भागात घरोघरी जावून मर्यादित कालावधीत तपासणी पूर्ण केली जाईल. रुग्णांचा शोध घेऊन त्यांचं सुरक्षित अलगीकरण, विलगीकरण केलं जाईल. कोरोना प्रसार रोखण्यासाठी जनजागृती करुन लोकसहभाग वाढवण्यात येईल. विभागीय आयुक्तांसह जिल्ह्याधिकारी, महापालिका आयुक्तांसह प्रमुख अधिकारी नियमित पत्रकार परिषद घेऊन नागरिकांशी संवाद साधतील. नागरिकांना, लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन कोरोनाविरुद्धची लढाई एकजुटीनं लढली जाईल आणि आम्ही पुणेकर कोरोनाविरुद्धची ही लढाई नक्की जिंकू, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करणार दौरा दरम्यान, पुण्यात कोरोनाव्हायरलचा वाढता प्रकोप राज्याच्याच नव्हे तर देशाच्या चिंतेचा विषय ठरला आहे. केंद्रीय पथकानेही पाहणी करून शहरातल्या परिस्थितीचा आढावा घेत काही सूचना दिल्या. अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे दौरा करायचं निश्चित केलं आहे. येत्या दोन दिवसात मुख्यमंत्री पुण्याचा दौरा करतील, अशी माहिती अजित पवार यांनी दिली आहे. राज्यातला प्रत्येक तिसरा कोविड पॉझिटिव्ह रुग्ण पुणे जिल्ह्यात आहे, इतकी इथली परिस्थिती भीषण आहे. शरद पवारांच्या दौऱ्याच्या सूचनेनंतर आणि भाजपने केलेल्या शेरेबाजीनंतर अखेर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा पुणे दौरा ठरला, अशी चर्चा आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या