Home /News /pune /

Corona Updates In Pune: पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी Corona चा विस्फोट, 10 हजारांहून अधिक रुग्ण

Corona Updates In Pune: पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी Corona चा विस्फोट, 10 हजारांहून अधिक रुग्ण

Corona Updates In Pune: राज्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यातही कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळतोय. मुंबई आणि पुण्यासारखा (Mumbai and Pune) जिल्ह्यात कोरोनानं कहर केला आहे.

    पुणे, 17 जानेवारी: महाराष्ट्र (Maharashtra) राज्यात कोरोनानं पुन्हा एकदा कहर केला आहे. देशातील कोरोनाची रुग्णसंख्या (corona patients) पाहता सर्वाधिक रुग्ण हे राज्यात आढळून येत आहेत. त्यातच राज्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यातही कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळतोय. मुंबई आणि पुण्यासारखा (Mumbai and Pune) जिल्ह्यात कोरोनानं कहर केला आहे. पुण्यात रविवारी सलग तिसऱ्या दिवशी एका दिवसात 10 हजारांहून अधिक नवे कोरोना रुग्ण आढळून आलेत. पुणे जिल्ह्यात रविवारी दिवसभरात 10 हजार 102 नवे रुग्ण आढळून आले आहेत. यामध्ये पुणे शहरातील 5 हजार 375 जण आहेत. शनिवारी जिल्ह्यात 10 हजार 281 नवे कोरोना रुग्ण तर शुक्रवारी नवे रुग्ण सापडण्याचा आकडा 10 हजार 76 इतका होता. जिल्हा परिषदेच्या जिल्हा आरोग्य विभागाच्यावतीने पुणे जिल्ह्यातील कोरोना आकडेवारीचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्याचवेळी पुण्यात सलग दुसऱ्या दिवशी नव्या रुग्णांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या निम्‍याहून कमी आहे. रविवारी 5 हजार 405 जण कोरोनामुक्त झाले आहेत. काल कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा आकडाही वाढला आहे. काल दिवसभरात जिल्ह्यात आठ जणांचा मृत्यू झाला. मृतांची हीच संख्या शनिवारी पाच होती. जिल्ह्यातील दिवसाभरातील एकूण नवीन रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमध्ये 2 हजार 626, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात 1 हजार 505 , नगरपालिका हद्दीत 384, कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात 212 नवे कोरोना रुग्ण सापडले आहेत. दिवसातील एकूण कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये पुणे शहरातील 3 हजार 90, पिंपरी चिंचवडमधील 1 हजार 535, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील 588, नगरपालिका हद्दीतील 161 आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील 31 जण आहेत. दिवसातील एकूण कोरोना मृत्यूमध्ये पुणे शहरातील पाच, पिंपरी चिंचवडमधील एक आणि जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील दोन मृत्यू आहेत. मुंबईत कोरोनाची आकडेवारी घसरली मुंबईत शनिवारी (15 जानेवारी) 10 हजार 661 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले होते. पण रविवारी हीच आकडेवारी 7 हजार 895 वर पोहोचली आहे. मुंबईत शनिवारच्या तुलनेने रविवारच्या नव्या कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत जवळपास तीन हजारांची घट झाल्याचं चित्र आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी हा सर्वात मोठा दिलासा मानला जातोय. मुंबईत रविवारी दिवसभरात हजारो रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. तर 11 रुग्णांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. मुंबईत सध्या 60 हजार 371 सक्रिय रुग्ण मुंबईत दिवसभरात 21 हजार 25 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे मुंबईत एकूण बरे झालेल्या रुग्णांची संख्या ही 9 लाख 20 हजार 387 इतकी आहे. मुंबई रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 92 टक्क्यांवर पोहोचलं आहे. तर डबलिंग रेट हा 48 दिवसांवर पोहोचला आहे. मुंबईत कोरोना संसर्गाचा ग्रोथ रेट हा 1.40 टक्के इतका आहे. तर सध्या 60 हजार 371 रुग्ण सक्रिय आहेत. त्यांच्यावर सध्या उपचार सुरु आहेत.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Coronavirus, Pune (City/Town/Village)

    पुढील बातम्या