मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

पुण्यात कोरोनाला रोखण्यासाठी मोठा निर्णय, आणखी 22 भाग होणार सील

पुण्यात कोरोनाला रोखण्यासाठी मोठा निर्णय, आणखी 22 भाग होणार सील

पुण्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या मार्केटयार्ड ते आरटीओपर्यंतचा भाग सील असून आता आणखी २२ भाग सील होणार आहेत.

पुण्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या मार्केटयार्ड ते आरटीओपर्यंतचा भाग सील असून आता आणखी २२ भाग सील होणार आहेत.

पुण्यात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या मार्केटयार्ड ते आरटीओपर्यंतचा भाग सील असून आता आणखी २२ भाग सील होणार आहेत.

  • Published by:  Suraj Yadav
पुणे, 13 एप्रिल : देशात कोरोनाचा प्रभाव वाढतच चालला आहे. महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण असून मुंबईनंतर पुण्यात कोरोनाग्रस्तांची संख्या अधिक आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुण्यातील आणखी २२ ठिकाणे सील होणार आहेत. महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत पत्र पाठविले आहे. पुण्यात सध्या मार्केटयार्ड ते आरटीओपर्यंतचा भाग सील आहे. आता आणखी २२ भाग सील होणार आहेत. नव्याने सील करण्यात येणाऱा बहुतांशी भाग हा दाट लोकवस्ती व झोपडपट्टी परिसर आहे़. पालिका प्रशासनाने याबाबतचा प्रस्ताव जिल्हाधिकारी कार्यालयास सोमवारी सादर केला आहे़. हे भाग पूर्णपणे सील करण्यापूर्वी आवश्यक पोलिसबळ उपलब्ध आहे का याची चाचपणी सध्या जिल्हाधिकारी कार्यालयाकडून येत असून, पोलीस यंत्रणेकडून याबाबत अहवाल प्राप्त झाल्यावर हा निर्णय अपेक्षित आहे. ही २२ ठिकाणे  होणार सील 1. प्रायव्हेट रोड पत्राचाळ, लेन क्र. १ ते ४८, ताडीवाला रोड प्रभाग क्र. २० 2. संपूर्ण ताडीवाला रोड 3. घोरपडी गाव, विकासनगर, बालाजीनगर, श्रावस्तीनगर प्रभाग क्र. २ 4. राजेवाडी, पद्मजी पोलीस चौकी, जुना मोटार स्टॅँड, संत कबीर, एडी कॅम्प चौक, क्वार्टर गेट, भवानी पेठ प्रभाग क्र. २० 5. विकासनगर, वानवडी गाव 6. लुम्बिनी नगर, ताडीवाला रोड 7. चिंतामणी नरगर, हांडेवाडी रोड, प्रभाग क्र. २६ व २८ 8. घोरपडी गाव, बी. टी. कवडे रोड 9. संपूर्ण लक्ष्मीनगर, रामनगर, जयजवान नगर, येरवडा प्रभाग क्र. ८ 10. सय्यदनगर, मह्ममदवाडी हडपसर प्रभाग क्र. २३, २४व २६ 11. पर्वती दर्शन परिसर 12. सम्राट हॉटेल ते पाटकर प्लॉट, पुणे- मुंबर्स रस्ता ते भोसलेवाडी, कामगार आयुक्त कार्यालय, रेल्वे डावी बाजू व उजव्या बाजुस नरवीर तानाजी चौक ते जुने शिवाजीनगर एसटी स्टॅँड, पटेल टाईल्स, विक्रम टाईल्स, इराणी वस्ती सर्व्हे 13. संपूर्ण पाटील इस्टेट परिसर 14. संपूर्ण भोसलेवाडी परिसर 15. वाकडेवाडी परिसर प्रभाक क्र. ७ 16. एनआयबीएम रोड, कोंढवा प्रभाग क्र. २६ 17. संपूर्ण कोंढवा खुर्द परिसर, साईनगर 18. वडगाव शेरी परिसर प्रभाग क्र. ५ 19. धानोरी प्रभाग क्र. १ 20. येरवडा प्रभाग क्र. ६ 21. विमानगर प्रभाग क्रमांक 3 राज्यात सोमवारी वाढ झालेल्या 352 रुग्णांपैकी 242 रुग्ण हे मुंबईतील आहेत. तर पुण्यातही गेल्या 24 तासांत 39 रुग्ण आढळले आहेत. राज्यात  कोरोना रूग्णांची संख्या रविवारपर्यंत 1982 इतकी होती ती आज 352 ने वाढून 2334 पर्यंत पोहोचली आहे. हे वाचा : कोरोना वॉरिअर्सची ताकद वाढणार, मुंबईतील नामवंत डॉक्टरांचा कोरोनाच्या लढाईत सहभाग देशातल्या आकडेवारीनुसार गेल्या 24 तासांमध्ये 51 जणांचा मृत्यू झाला. ही आत्तापर्यंतची सर्वात जास्त संख्या आहे. तर कोरोना रुग्णांची सख्या 9352 वर पोहोचली आहे तर मृत्यूची संख्या 324 वर गेली आहे. 8048 रुग्ण उपचार घेत असून 979 जणांना सुट्टी देण्यात आली आहे. त्यात 72 विदेशी नागरिकांचा समावेश आहे. हे वाचा : राज्यातल्या शहरांमध्ये चाललंय काय? इंटरनेटवर कसला सर्च वाढला हे पाहून वाटेल लाज
First published:

Tags: Coronavirus

पुढील बातम्या