मराठी बातम्या /बातम्या /पुणे /अखेर कसब्यातून काँग्रेस लढणार, नाना पटोलेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा

अखेर कसब्यातून काँग्रेस लढणार, नाना पटोलेंनी केली उमेदवाराच्या नावाची घोषणा

 कसबा पोटनिवडणूक कोण लढवणार यावरून अखेर नाना पटोले यांनी पडदा बाजूला केला आहे.

कसबा पोटनिवडणूक कोण लढवणार यावरून अखेर नाना पटोले यांनी पडदा बाजूला केला आहे.

कसबा पोटनिवडणूक कोण लढवणार यावरून अखेर नाना पटोले यांनी पडदा बाजूला केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

पुणे, 06 फेब्रुवारी : पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे. कसबा मतदारसंघ अखेरीस काँग्रेसला देण्यात आला आहे. काँग्रेसमधून रवींद्र हेमराज धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. खुद्द काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीच घोषणा केली आहे.

कसबा पोटनिवडणूक कोण लढवणार यावरून अखेर नाना पटोले यांनी पडदा बाजूला केला आहे. पुणे जिल्ह्यातील कसबा मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित लढणार आहेत.

कसबा मतदारसंघाची जागा कॉंग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय झाला असून येथून रवींद्र हेमराज धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे, अशी घोषणा नाना पटोले यांनी केली आहे. त्यामुळे कसब्यामध्ये रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजपचे उमेदवार हेमंत रासने लढत पाहण्यास मिळणार आहे.

तर दुसरीकडे, रवींद्र धंगेकर हे आज थेट टिळक वाड्यावर पोहोचले होते. त्यांनी टिळक वाड्यात जाऊन गणपतीचं दर्शन घेतलं. त्यानंतर त्यांनी मुक्ता टिळक यांच्या फोटोला देखील अभिवादन केलं आहे. त्यांच्यासोबत काँग्रेस नेते रोहित टिळक हे देखील आहेत. यावेळी बोलताना रोहित टिळक यांनी म्हटलं की, भाजप टिळक वाड्यात तिकीट देईल असं वाटत होतं, म्हणूनच मला पक्षाने विचारणा करूनही शांत राहिलो. पण भाजपने टिळक कुटुंबीयांना तिकीट नाकारलं, याचा भाजपला फटका बसणार आहे. भाजपने ब्राह्मण समाजाला गृहित धरू नये, या नाराजीचा त्यांना फटका बसेल, मी काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून रवी धंगेकर यांच्या पाठिशी असल्याचं रोहित टिळक यांनी म्हटलं आहे.

चिंचवडमधून उमेदवारी कुणाला?

महविकास आघाडीतील चिंचवड विधानसभा कोण लढवणार यावर अजून एकमत झाले नाही. ठाकरे गटाचे राहुल कळाटे आणि राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेल्या मोरेश्वर भोंडवे आणि नाना काटे यांच्यामध्ये उमेदवारी घेण्यासाठी रस्सीखेच सुरू आहे. उमेदवारी जाहीर होत नसल्याने महाविकास आघाडीमध्ये शुकशुकाट आहे.

First published: