मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

Maratha Reservation सरकारची भूमिका योग्यच होती, भाजपची टीका द्वेष भावनेतून; सचिन सावंतांचा घणाघात

Maratha Reservation सरकारची भूमिका योग्यच होती, भाजपची टीका द्वेष भावनेतून; सचिन सावंतांचा घणाघात

आरक्षणासंदर्भात राज्याची भूमिका योग्य होती, हे केंद्राच्या याचिकेवरून स्पष्ट झालं आहे. त्यामुळं भाजपकडून होणारी टीका ही केवळ द्वेषभावनेतून होणारी आणि अत्यंत दुर्दैवी असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Congress spokesperson Sachin Sawant Press Conference) यांनी केला आहे.

पुढे वाचा ...

पुणे, 14 मे :  मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation) मुद्द्यावरून राज्यातीलस महाविकास आघाडी सरकार (Mahavikas Aghadi) आणि भारतीय जनता (BJP) पक्ष आमनेसामने उभा ठाकल्याचं पाहायला मिळत आहे. आरक्षणासंदर्भात राज्याची भूमिका योग्य होती, हे केंद्राच्या याचिकेवरून स्पष्ट झालं आहे. त्यामुळं भाजपकडून होणारी टीका ही केवळ द्वेषभावनेतून होणारी आणि अत्यंत दुर्दैवी असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत (Congress spokesperson Sachin Sawant Press Conference) यांनी केला आहे. मुंबईत घेतलेल्या एका पत्रकार परिषदेत त्यांनी हा आरोप केला आहे.

(वाचा-'PM Cares मधून कॉर्पोरेट कंपन्यांना दिलं जातंय दान', काँग्रेस नेत्याचा आरोप)

सचिन सावंत यांनी पुण्यातील काँग्रेस भवनमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून केली जाणारी भाजपची टीका ही दुर्दैवी आणि द्वेष भावनेतून असल्याचा आरोप त्यांनी केला. केंद्र सरकारने मराठा आरक्षणासंदर्भात पावलं उचलताना 102 व्या घटना दुरूस्तीसंदर्भात फेरविचार याचिका दाखल केली आहे. केंद्राने ही याचिका दाखल केल्याने महाविकास आघाडी सरकारची मराठा आरक्षणा संबंधीची भूमिका योग्यच होती, हे आता स्पष्ट झालं असल्याचं सचिन सावंत म्हणाले.

(वाचा-"भाजप खासदार असताना माझा फोन टॅप करण्यात आला, इतर नेत्यांचेही फोन टॅप झाले")

दरम्यान, इंद्रा साहनी खटला निकालातील आरक्षणाच्या 50 टक्के मर्यादेच्या मुद्द्याच्या विरोधातही केंद्र सरकारनं भूमिका घ्यावी, असा आग्रह सचिन सावंत यांनी पत्रकार परिषदेत केला. एकिकडे भाजप सरकारवर आरक्षणाचा मुद्दा कोर्टासमोर जोरकसपणे मांडला नाही असा आरोप करत आहे. पण देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मराठा आरक्षणासाठी अत्यंत महत्त्वाच्या अशा गायकवाड आयोगाची कार्यकक्षाच निश्चित केली नाही. त्यामुळं सुप्रीम कोर्टानं हा अहवाल ग्राह्य धरला नाही, असा आरोपही सचिन सावंत यांनी केला आहे.

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजप वारंवार सरकारवर आणि इतर पक्षांवर आरोप करत आहे. पण मराठा आरक्षणाला विरोध करणारी सेव्ह द मिरीट ही संस्था संघाशीच संबंधिताने स्थापन केली आहे असा आरोप सावंत यांनी केला. डॉ. अनुप मरार हे भाजपचे पदाधिकारी आहेत. यासंदर्भात भाजपने उत्तर द्यावे असंही सचिन सावंत यांनी म्हटलं आहे. त्यामुळं आरक्षणाच्या मुद्द्यावरून आता दोन्ही पक्ष आमनेसामने येत असल्याचं पाहायला मिळत आहे. या आरोप प्रत्यारोपांमध्ये प्रत्यक्ष मराठा आरक्षणाच्या मुद्द्याचं काय? हा प्रश्न मागेच राहिला आहे.

First published:

Tags: BJP, Congress, Maratha reservation