Home /News /pune /

कोरोनावर मात केल्यानंतर राजीव सातव यांची प्रकृती खालावली, न्युमोनियाचा झाला संसर्ग

कोरोनावर मात केल्यानंतर राजीव सातव यांची प्रकृती खालावली, न्युमोनियाचा झाला संसर्ग

राजीव सातव यांना रुग्ण्यालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता होती. पण, अचानक सातव यांची प्रकृती खालावली आहे.

    पुणे, 15 मे : काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आणि गुजरातचे प्रभारी राजीव सातव (Congress leader Rajiv Satav) यांनी पाच दिवसांपूर्वीच कोरोनावर मात केली होती. पण, आज त्यांची प्रकृती पुन्हा एकदा खालावली असून न्युमोनियाचा (pneumonia) संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या गटातून चिंता व्यक्त केली जात आहे. खासदार राजीव सातव यांना एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. अखेर उपचाराअंती 10 मे रोजी त्यांची कोरोनाची चाचणी निगेटिव्ह आली होती.  त्यामुळे लवकरच राजीव सातव यांना रुग्ण्यालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता होती. पण, आता अचानक राजीव सातव यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना न्युमोनियाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात येण्याची शक्यता आहे, असं वृत्त एबीपी माझा वृत्तवाहिनीने दिले आहे. 'तुम्हाला आता माशा मारण्याशिवाय कामच काय उरलंय', मलिकांचा फडणवीसांना टोला राजीव सातव यांची प्रकृती खालावल्याचे वृत्त हाती आल्यानंतर काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्त्यांनी हॉस्पिटलकडे धाव घेतली आहे. राजीव सातव यांच्यावर जहांगीर हॉस्पिटलमध्ये गेल्या 22 दिवसांपासून उपचार सुरू आहे. 'बलिदान द्यायलाही तयार'; म्यानमारची ब्यूटी क्वीन रायफलसह सैन्याविरोधात मैदानात राजीव सातव हे काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आहे. विशेष म्हणजे, राहुल गांधी यांचे ते विश्वासू सहकारी मानले जातात. मागील वर्षी अहमदबादमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं निधन झाल्यामुळे गुजरातच्या प्रभारीपदी राजीव सातव यांची निवड झाली. राजीव सातव हे हिंगोली मतदारसंघातून खासदार म्हणून 2014 साली निवडून आले होते. राज्यातील अनेक बिकट परिस्थितीत त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या