मराठी बातम्या /बातम्या /पुणे /

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट अखेर निगेटिव्ह!

काँग्रेसचे खासदार राजीव सातव यांची कोरोनावर मात, रिपोर्ट अखेर निगेटिव्ह!

पुणे, 10 मे: काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आणि गुजरातचे प्रभारी राजीव सातव (Congress leader Rajiv Satav) यांना कोरोनावर (Corona) मात केली आहे. त्यांचा कोरोनाचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे, अशी माहिती पुण्यातील जहांगीर हॉस्पिटल प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे लवकरच राजीव सातव यांना रुग्ण्यालयातून डिस्चार्ज मिळण्याची शक्यता आहे.

खासदार राजीव सातव यांना एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, काही दिवसांची त्यांची प्रकृती अचानक खालावली होती. त्यामुळे त्यांना तातडीने मुंबईला हलवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. यासाठी लीलावती हॉस्पिटलच्या टीमने पुण्यात येऊन तपासणी केली होती. त्यानंतर पुण्यात त्यांच्यावर उपचार सुरू राहतील, असं स्पष्ट करण्यात आले होते.

तरुणाची पोटासाठी वणवण; रस्त्यावर सांडलेलं दूध पितानाचा सुन्न करणारा VIDEO

उपचाराअंती राजीव सातव यांच्या प्रकृतीत सुधारणा होत गेली. अखेरीस 19 दिवसांच्या उपचारानंतर राजीव सातव यांची कोरोनाची चाचणी निगेटीव्ह आली आहे. त्यांना लवकरच हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येण्याची शक्यता आहे.

मुंबई हादरली, अभिनेत्रीसह बहिणीवर बलात्कार, 5 जणांविरोधात गुन्हा दाखल

राजीव सातव हे काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आहे. विशेष म्हणजे, राहुल गांधी यांचे ते विश्वासू सहकारी मानले जातात. मागील वर्षी अहमदबादमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं निधन झाल्यामुळे गुजरातच्या प्रभारीपदी राजीव सातव यांची निवड झाली. राजीव सातव हे हिंगोली मतदारसंघातून खासदार म्हणून 2014 साली निवडून आले होते. राज्यातील अनेक बिकट परिस्थितीत त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

First published: