पुणे, 29 एप्रिल : पुण्यात (Pune) कोरोनाने थैमान घातले आहे. सर्वसामान्यप्रमाणे लोकप्रतिनिधींनाही कोरोनाची लागण झाली आहे. काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आणि गुजरातचे प्रभारी राजीव सातव (Congress leader Rajiv Satav ) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांची प्रकृती खालावल्यामुळे मुंबईतील लीलावती हॉस्पिटलमध्ये (lilavati hospital mumbai) हलवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
राजीव सातव यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांना पुण्यातील जहांगीर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू होते. परंतु, मंगळवारी त्यांची प्रकृती अचानक खालावली. त्यामुळे त्यांना तातडीने मुंबईला हलवण्याचा निर्णय घेण्यात आला.
पुणे जिल्ह्यातील रहिवासी शाळेतील 48 मुलींसह 9 शिक्षकांना कोरोना
मुंबईतील लीलावती हॉस्पिटलची एक टीम पुण्यात उपचार करण्यासाठी पोहोचली आहे. परंतु, प्रकृतीत सुधार होत नसल्यामुळे त्यांना मुंबईला हलवण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. पुढील उपचार हे लीलावती हॉस्पिटलमध्ये होणार असल्याची माहिती आहे.
18 ते 44 वयोगटातील सर्वांना मोफत लसीकरण, मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची घोषणा
राजीव सातव हे काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार आहे. विशेष म्हणजे, राहुल गांधी यांचे ते विश्वासू सहकारी मानले जातात. मागील वर्षी अहमदबादमध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांचं निधन झाल्यामुळे गुजरातच्या प्रभारीपदी राजीव सातव यांची निवड झाली. राजीव सातव हे हिंगोली मतदारसंघातून खासदार म्हणून 2014 साली निवडून आले होते. राज्यातील अनेक बिकट परिस्थितीत त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.