पुणे, 4 फेब्रुवारी : पुण्यामधून मोठी बातमी समोर येत आहे. कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीकडून उमेदवारांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे. थोड्याच वेळात अधिकृतरित्या महाविकास आघाडीकडून उमेदवारांच्या नावाची घोषणा होणार आहे. सुत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार कसबा मतदारसंघ काँग्रेसच्या वाट्याला तर चिंचवड मतदारसंघातून राष्ट्रवादीला उमेदवारी देण्यात आली आहे.
कसबा काँग्रेसकडे
भाजप आमदार मुक्ता टिळक यांच्या निधानामुळे कसबा विधानसभा मतदारसंघ तर लक्ष्मण जगताप यांच्या निधनामुळे चिंचवड मतदारसंघ रिक्त झाला आहे. या रिक्त जागेवर पोटनिवडणुकीची घोषणा करण्यात आली आहे. मिळत असलेल्या माहितीनुसार कसबा मतदारसंघातून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत, तर चिंचवडमधून राष्ट्रवादीचे राहुल कलाटे यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. थोड्याच वेळात महाविकास आघाडीकडून दोनही उमेदवारांची नावे अधिकृतरित्या जाहीर होणार असल्याची माहिती सुत्रांकडून मिळत आहे.
हेही वाचा : उद्धव ठाकरेंना वेळोवेळी सांगत होतो पण..; राऊतांचा अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्याला दुजोरा
भाजपकडून कोणाला उमेदवारी?
दरम्यान भाजपकडून ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न सुरू होते, मात्र आता महाविकास आघाडीकडून उमेदवार देण्यात येणार असल्यानं भाजपचं टेन्शन वाढलं आहे. भाजप नेमकी कोणाला उमेदवारी देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Ajit pawar, BJP, Chandrakant patil, Congress, NCP, Pune, Shiv sena