पुणे, 18 डिसेंबर : मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी कर्नल पुरोहित यांच्यावरील पुस्तकाचे प्रकाशन सोहळ्यावरुन वाद निर्माण झाला आहे. शहरातील एसपी कॉलेज येथे पुरोहित यांच्या 'द मॅन बेट्रेड' या पुस्तकाचा पुस्तक प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. दरम्यान या पुस्तकाविरोधात पुण्यात पुरोगामी संघटना आक्रमक झाल्या आहे. या पुस्तकाच्या प्रकाशनाला जोरदार विरोध करत कॉलेजबाहेर जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.
लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांच्या 'द मॅन बेट्रेड' या पुस्तक प्रकाशनाला पुरोगामी विचारांच्या संघटनांकडून विरोध करण्यात येत आहे. पुस्तकाचे प्रकाशन आपल्या महाविद्यालयात होऊ देऊ नका अशी विनंती देखील या कार्यकर्त्यांनी एस पी कॉलेजच्या प्राचार्यांकडे केली होती. विरोधानंतरही प्रकाशन सोहळा करण्यावर आयोजक ठाम आहेत. जयंत उमराणीकर, सत्यपाल सिग यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. मात्र, अभिनेते शरद पोंक्षे आणि सत्यपाल सिग हे गैरहजर राहिले. तर कॉलेजबाहेर कर्नल पुरोहित मुर्दाबाद नावाने घोषणाबाजी सुरू आहे. मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी ले. कर्नल पुरोहित यांच्यावरील पुस्तक रद्द करा, अशी पुरोगामी संघटनानी केली आहे.
वाचा - Gram Panchayat election : पुण्यात राष्ट्रवादीचा बोलबाला, भाजपच्या वाट्याला एकच ग्रामपंचायत!
काय होतोय विरोध?
कर्नल पुरोहित 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपी आहेत. ज्यात 6 लोकांचा मृत्यू झाला होता तसेच अनेकजण जखमी झाले होते. असे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. दरम्यान पुस्तक प्रकाशन करु नये अशी विनंती आम्ही केली असून पुस्तक प्रकाशन होऊ देणारं नाही असे पुरोगामी संघटनांकडून सांगण्यात आलं. तसेच आंदोलनाचा इशारा देखील पुरोगामी विचारसरणीच्या संघटनांनी दिला होता. स्मिता मिश्रा लिखित या पुस्तकाचे जयंत उमराणीकर, सत्यपाल सिंग यांच्या हस्ते प्रकाशन होणार आहे. यावेळी एस पी कॉलेजपासून जवळ असलेल्या एका ठिकाणी पुरोगामी संघटनांनी एकत्र येत आंदोलन केले. या प्रकाशन कार्यक्रमासाठी एस पी कॉलेज बाहेर पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यानंतर एस पी कॉलेज परिसराला पोलिसांच्या छावणी चे स्वरूप आले आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.