Home /News /pune /

धक्कादायक! पुण्यात महाविद्यालयीन तरुणासोबत अघोरी कृत्य; मारहाण करत ब्लेडनं कापल्या...

धक्कादायक! पुण्यात महाविद्यालयीन तरुणासोबत अघोरी कृत्य; मारहाण करत ब्लेडनं कापल्या...

Crime in Pune: पुणे शहरातील समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका 17 वर्षीय महाविद्यालयीन तरुणासोबत दोन जणांनी अघोरी कृत्य केलं आहे.

    पुणे, 02 फेब्रुवारी: पुणे (Pune) शहरातील समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र घटना समोर आली आहे. येथील एका 17 वर्षीय महाविद्यालयीन तरुणासोबत दोन जणांनी अघोरी कृत्य केलं आहे. आरोपींनी संबंधित तरुणाला रास्ता पेठेतील महात्मा फुले चौकात भेटायला बोलावून त्याला शिवीगाळ करत मारहाण (College student beating) केली आहे. नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी जबरदस्तीने तरुणाच्या भुवया कापल्या (Cut eye brow with blade) आहेत. या प्रकरणी पीडित तरुणाच्या वडिलांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. समर्थ पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. रिझवान खलिल (रा. कागदीपुरा, कसबा पेठ) आणि साथीदार साहिल कुरेशी असं गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावं आहेत. दोन्ही आरोपी फरार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतरा वर्षीय पीडित तरुण पुण्यातील एका महाविद्यालयात शिक्षण घेतो. घटनेच्या दिवशी तो क्लासला जात होता. हेही वाचा-धावत्या कारवर बसून तरुणाचा जीवघेणा स्टंट;मुंबई पोलिसांनी घडवली अद्दल, पाहा VIDEO यावेळी आरोपी खलिल आणि कुरेशी यांनी संबंधित युवकाला मोबाइलवर फोन केला. तसेच 'तुझं शिकवणी वर्गात काय भानगड सुरू आहे, हे आम्हाला माहीत आहे. तू महात्मा फुले चौकात ये आपण प्रकरण मिटवू' असं युवकाला सांगितलं. त्यानुसार पीडित युवक रास्ता पेठेतील महात्मा फुले चौकात आरोपींना भेटण्यासाठी गेला. याठिकाणी आरोपींनी युवकाला धमकावून त्याला शिवीगाळ केली. तसेच मारहाण देखील केली. हेही वाचा-क्षणात होत्याचं नव्हतं झालं; कुटुंबासोबत घडलं आक्रीत, पत्नीसह बाळाचा मृत्यू नराधम आरोपी एवढ्यावरच थांबले नाहीत, तर साथीदार कुरेशी याने संबंधित युवकाचे हात पकडले तर खलिल याने ब्लेडने तरुणाच्या भुवया कापल्या आहेत. हा धक्कादायक प्रकार केल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला. मुलासोबत घडलेला प्रकार समजल्यानंतर पीडित तरुणाच्या वडिलांनी तातडीने समर्थ पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दाखल केली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Beating retreat, Crime news, Pune

    पुढील बातम्या