Home /News /pune /

राज्यात थंडीचा कहर, धुळ्यात तापमानाचा पारा 7 अंशावर, जाणून घ्या पुण्यातील हवामान

राज्यात थंडीचा कहर, धुळ्यात तापमानाचा पारा 7 अंशावर, जाणून घ्या पुण्यातील हवामान

पावसाळा ऋतू (Monsoon) संपून दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटला आहे. असं असताना देखील महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा (Non seasonal rain) जोर सुरू आहे.

    पुणे, 15 जानेवारी: पावसाळा ऋतू (Monsoon) संपून दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ उलटला आहे. असं असताना देखील महाराष्ट्रासह देशात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाचा (Non seasonal rain) जोर सुरू आहे. पूर्व भारत आणि आंध्र प्रदेशातील किनारी भागात पुढील दोन दिवस जोरदार पावसाची (Rainfall) शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर उत्तर भारतात दाट धुक्यासह थंडीचा कडाका (Cold wave) वाढणार असल्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. याचा एकंदरित परिणाम म्हणून महाराष्ट्रात देखील थंडीचा कडाका वाढणार आहे. मागील चोवीस तासात राज्यात अनेक ठिकाणी किमान तापमानाचा पारा घसरला आहे. धुळे जिल्ह्यात किमान तापमानात 3 अंशांची घसरण झाली आहे. काल येथील किमान तापमान 10.5 अंशावर होतं, आज हेच तापमान 7.6 अंशावर पोहोचलं आहे. दरम्यान राज्यात अनेक ठिकाणी धुक्याची चादर आणखी दाट झाली आहे. त्यामुळे पहाटे आणि रात्रीच्या वेळी प्रवास करणाऱ्या नागरिकांना याचा प्रचंड त्रास होतं आहे. बुलडाणा जिल्ह्यात दाट धुके पडल्याने जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर वाहतुकीला ब्रेक लागला आहे. तसेच रेल्वेसेवा देखील प्रभावित झाल्याचं पाहायला मिळालं आहे. हेही वाचा-बाबो..! 'या' देशात मास्क आणि लसीकरणाची आवश्यकता नाही, सरकारनेच घेतला निर्णय दुसरीकडे, आज पुण्यात पाषाण याठिकाणी सर्वात कमी 11.9 अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. कालच्या तुलनेत पुण्यातील किमान तापमान किंचित वाढलं आहे. यासोबतच इंदापूर (12.5), माळीण (12.6), एनडीए (12.6), हवेली (12.7) आणि राजगुरूनगर याठिकाणी (12.8)  अंश सेल्सिअसची नोंद झाली आहे. पुण्यात इतर ठिकाणी किमान तापमानाचा पारा 13 ते 18 अंश सेल्सिअस दरम्यान नोंदला आहे. हवामान खात्याने आज पश्चिम बंगाल, सिक्कीम आणि झारखंडमध्ये हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर पश्चिम बंगाल आणि सिक्कीममध्ये विजांच्या कडकडाटासह गारपीट होण्याची शक्यता आहे. अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, आसाम, मेघालय, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. येत्या 4 ते 5 दिवसांत तामिळनाडू, पॉंडेचेरी, कराईकल, केरळ आणि माहे या ठिकाणी मेघगर्जनेसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवली आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Maharashtra, Pune, Weather forecast

    पुढील बातम्या