पुणे, 31 जुलै : पुणे पोलीस (Pune Police) दलात पोलीस उपायुक्त पदावर कार्यरत असलेल्या आयपीएस प्रियंका नारनवरे (Priyanka Narnavare) यांची फुकट बिर्याणीची (Free biryani) ऑर्डर देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या ऑडिओ क्लिपमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली असून आता पोलीस दलातील कोल्ड वॉर समोर आले आहे. फुकट बिर्याणी मागण्याचा आरोप झालेल्या आयपीएस प्रियंका नारनवरे यांनी माध्यमांकडे खुलासा करताना धक्कादायक आरोप केला आहे.
प्रियंका नारनवरे यांनी म्हटलं की त्यांच्याविरोधात फुकट बिर्याणीची ऑडिओ क्लिप बाहेर आली आहे. एका षड्यंत्राचा भाग असून वसुली करणारा कॅट मोडून काढल्यामुळे दुखावलेल्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी हा प्रकार घडवून आणल्याचा आरोप त्यांनी केला आहे. यामध्ये त्यांच्या जागी पूर्वी असलेल्या डीसीपी यांचे हितसंबंध असल्यानेच हा प्रकार घडविण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. नारनवरे यांच्या खुलाशानंतर पुणे पोलीस दलातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांमध्ये सुरू असलेलं कोल्ड वॉर समोर आलं आहे.
धक्कादायक म्हणजे एक आयपीएस अधिकारीच पुणे पोलिसांकडून होणाऱ्या वसुलीची कबुली देतोय त्यावर पुण्याचे पोलीस आयुक्त मुग गिळून गप्प आहेत. पुण्यात खरंच वसुली होते का? या प्रश्नाचे उत्तर द्या पोलीस आयुक्त साहेब, न्यूज18 लोकमतच पोलीस आयुक्तांना आव्हान.
फुकट बिर्याणीच्या आरोप ज्या आधिकार्यांवर झालेत त्या आयपीएस प्रियंका नारनवरे यांच्याशी आम्ही बोललो, तेव्हा त्यांनी हे आपल्या विरोधातील षड्यंत्र आहे असा दावा केला आहे. हे षड्यंत्र दुसरे तिसरे कुणी नाही तर पुणे पोलीस दलातील एक डीसीपी आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी केला असा दावाही त्यांनी केला आहे. या ऑडिओ क्लिपने आधीच पुणे पोलिसांची अब्रू वेशीवर टांगली आता अधिकारी यांच्या मधल्या राजकारणातून हे घडल्याचं रेकॉर्डवर सांगणाऱ्या प्रियंका नारनवरे यासंदर्भात अधिकृत तक्रार देणार का असा प्रश्न आहे. इतकं सगळं होऊनही पुण्याचे पोलीस आयुक्त गप्प आहेत. पोलिसांमध्ये खरंच राजकारण सुरू आहे का? असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune, Pune police