मराठी बातम्या /बातम्या /पुणे /उद्धव ठाकरे यांची इतिहासात प्रथमच बारामतीत सभा, गोविंद बागेत खास प्रीतीभोज

उद्धव ठाकरे यांची इतिहासात प्रथमच बारामतीत सभा, गोविंद बागेत खास प्रीतीभोज

इतिहासात पहिल्यांदाच बारामतीत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे.  त्यामुळे या सभेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे

इतिहासात पहिल्यांदाच बारामतीत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे या सभेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे

इतिहासात पहिल्यांदाच बारामतीत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे या सभेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे

जितेंद्र जाधव,(प्रतिनिधी)

बारामती,16 जानेवारी: इतिहासात प्रथमच होणार मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची आज (गुरुवारी) बारामतीत सभा होत आहे. कृषिकच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बारामतीला येत आहे. सकाळी 9 वाजता कृषिक शेती प्रदर्शनाचे उद्घाटन होणार आहे. बॉलीवूड अभिनेता अमीर खान याची या कार्यक्रमास खास उपस्थिती असणार आहे. इतिहासात पहिल्यांदाच बारामतीत शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. त्यामुळे या सभेकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे

बारामतीतील शारदानगर येथील 110 एकर मधील कृषी विज्ञान केंद्र आयोजित कृषिक शेती प्रदर्शन आजपासून सुरू होत आहे. चार दिवस चालणाऱ्या या प्रदर्शनाचे उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, कृषी मंत्री दादासाहेब भुसे कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री सुनील केदार खासदार सुप्रीया सुळे व सिने अभिनेता अमीर खान हे या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.

गोविंद बागेत खास भोजण व्यवस्था..

सभेनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व मान्यवरांची गोविंद बागेत शरद पवार यांच्या निवासस्थानी खास भोजणाची व्यवस्था करण्यात आली आहे. मुख्यमंत्री झाल्यानंतर उद्धव ठाकरे प्रथमच बारामतीत येत आहेत. जलयुक्त शिवार योजनेसोबत पाणी फौंडेशनच्या कामाचीही चर्चा जोरात असल्याने आमीरचीही हजेरी लक्षणीय ठरणार आहे. एकूणच बारामतीकरांना आज पर्वणी आहे.

राऊत vs भोसले.. शाब्दिक युद्ध

दुसरीकडे, छत्रपती शिवाजी महाराज यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी तुलना करणाऱ्या पुस्तकावरुन शिवसेनेचे खासदार संजय राऊत आणि भाजपचे नेते उदयनराजे भोसले यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू झाले आहे. आता पुन्हा एकदा संजय राऊत यांनी उदयनराजेंच्या लोकसभेतील पराभवावरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. संजय राऊत यांनी ट्वीट करून थेट भाजपलाच धारेवर धरलं आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे दैवत आहे. छत्रपतींच्या प्रत्येक गादी विषयी आम्हाला आदर आहे. पण छत्रपती उदयनराजे यांचा सातारा येथे पराभव घडवून आणला, असा गंभीर आरोप राऊत यांनी केला.

First published:
top videos

    Tags: Baramati, Latest news, Ncp sharad pawar, Udhav thackeray