Home /News /pune /

'सिरम'मध्ये अपघात की घातपात, ते चौकशीतून कळेल -मुख्यमंत्री

'सिरम'मध्ये अपघात की घातपात, ते चौकशीतून कळेल -मुख्यमंत्री

मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, भाजप खासदार गिरीश बापट यांच्यासह आग लागलेल्या संकुलास भेट दिली.

    पुणे, 22 जानेवारी :  कोरोनावर लस तयार करणाऱ्या सिरम इन्स्टिट्यूटच्या (Pune Serum Institute Fire) प्लांटला आग लागली होती. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm uddhav Thackery) यांनी आज घटनास्थळाची पाहणी केली. सिरमध्ये संस्थेला आग लागली की घातपात आहे, हे चौकशीतून स्पष्ट होईल, असं महत्त्वाचं विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले. मुंख्यमंत्री उद्धव ठाकरे, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, भाजप खासदार गिरीश बापट यांच्यासह  आग लागलेल्या संकुलास भेट दिली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्र्यांनी भूमिका मांडली. कोव्हीशिल्ड लसींचा प्लांट पूर्णपणे सुरक्षित आहे. आगीचा लसीकरणावर काहीही परिणाम झालेला नाही. आगीची चौकशी करण्यात येत आहे. पूर्ण होईस्तोवर कोणतेही भाष्य करणे योग्य होणार नाही, अपघात की घातपात ते नंतरच कळेल, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. या दुर्घटनेमध्ये ज्यांचा मृत्यू झाला आहे त्यांची जबादारी कंपनीने घेतली आहे. परंतु, आणखीही त्यांच्यासाठी काही करता येण्यासारखे असेल तर सरकार नक्की करेल, असं आश्वासनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले. शरद पवारांनीही घातपाताची शक्यता नाकारली दरम्यान, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर आहे.  पत्रकारांशी बोलत असता सीरम संस्थेत आग लागली या मागे घातपात असल्याची शक्यता वर्तवली जात आहे, असा प्रश्न शरद पवार यांना विचारण्यात आला होता. या प्रश्नाला उत्तर देताना शरद पवार म्हणाले की,'आज आपण असे बोलणे योग्य नाही. सीरम संस्था आणि तिथे काम करणाऱ्या सर्व संशोधकांवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. ही घटना पूर्णपणे अपघात आहे', असं पवार यांनी ठामपणे सांगितले. तसंच, 'सीरम ही जगमान्य संस्था आहे. सीरम संस्थेनं कोरोनावर पर्याय शोधण्यात यश मिळवले आहे. सीरम संस्थेत  आग लागली. ज्या ठिकाणी लस तयार होत आहे, त्या जागेपासून 5 किमी अंतरावर ही घटना घडली आहे', असंही पवार म्हणाले. आगीच्या घटनेच्या चौकशीचे आदेश 21 जानेवारी रोजी पुण्यातील हडपसर परिसरातल्या सीरम इन्स्टिट्यूटच्या प्लांटपैकी नव्या सहा मजली इमारतीला आग लागली. अंदाज असा होता की 4 लोक अडकले आहेत. ही माहिती मिळताच पुणे अग्निशमन दलाच्या गाड्या पोहोचल्या. त्यांनी या लोकांची तातडीने सुखरूप सुटका केली. त्यानंतर आग विझवण्याचं काम सुरू झालं. या इमारतीत वरच्या मजल्यावर कोणी असल्याची माहितीच नव्हती. हा मजला जळून खाक झाला होता. आग विझल्यानंतर त्या ठिकाणी कर्मचारी पोहोचले असता 5 जण मृत्युमुखी पडल्याचं लक्षात आलं. मृतदेह ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ही आग वेल्डिंगच्या कामादरम्यान लागल्याचं सांगण्यात येत आहे. पण आग नेमकी कशी लागली याची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या