Home /News /pune /

खराब हवामानामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कोयनानगर दौरा अखेर रद्द, CM विशेष विमानाने पुन्हा मुंबईकडे

खराब हवामानामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचा कोयनानगर दौरा अखेर रद्द, CM विशेष विमानाने पुन्हा मुंबईकडे

CM Uddhav Thackeray cancelled Satara visit: पावसाचा फटका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सातारा दौऱ्याला बसला आहे.

    पुणे, 26 जुलै: पावसाचा फटका मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Cm Uddhav Thackeray) यांच्या सातारा (Satara Visit) दौऱ्याला बसला आहे. मुसळधार पावसामुळे (Heavy Rainfall) मुख्यमंत्र्यांचा सातारा दौरा रद्द करण्यात आला आहे. कोयनानगर परिसरात हवामान अत्यंत खराब आणि कमी दृश्यमानतेमुळे हेलिकॉप्टर उतरण्यात अडथळा येत असल्यानं हा दौरा रद्द करावा लागला आहे. आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुण्याहून मुंबईला परतले आहेत. कोयनानगरातील दरडग्रस्तांना त्वरित मदत पोहोचवा. कोणताही विलंब न करता दरडग्रस्तांना मदत द्यावी, असे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला दिलेत. याआधी सकाळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुणे विमानतळावरून उड्डाण केल्यावर सातारा कोयना परिसरातील हवामान अत्यंत खराब झाल्यामुळे एअरफोर्सचे हेलिकॉप्टर पुन्हा पुणे विमानतळावर आणण्यात आलं. त्यानंतर हवामान सुधारण्याची वाट पाहण्यात आली. मात्र खराब हवामानामुळे मुख्यमंत्र्यांचा कोयनानगर दौरा अखेर रद्द झाला आहे. दौरा रद्द झाल्यावर मुख्यमंत्री विशेष विमानाने पुन्हा मुंबईकडे रवाना झाले. असा होता आजचा मुख्यमंत्र्यांचा दौरा सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील पूर परिस्थितीची पाहणी मुख्यमंत्री करणार होते. तसेच महापुराने बाधित झालेल्या लोकांच्या निवारा छावणीस भेट देऊन संवाद साधणार होते. कोयनानगर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील निवारा छावणीस भेट देऊन पूरग्रस्तांची विचारपूस केल्यानंतर जिल्हा प्रशासनासोबत आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची पत्रकार परिषदही आयोजित केली होती.
    Published by:Pooja Vichare
    First published:

    Tags: Cm, Pune, Satara, Uddhav thackeray

    पुढील बातम्या