Elec-widget

नव्या माळीण गावाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

नव्या माळीण गावाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

नव्या माळीण गावाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. नवीन आमडेमधील जागेत उभारलेल्या घरांचं माळीणवासियांना लोकार्पण केलं गेलं.

  • Share this:

02 एप्रिल :   नव्या माळीण गावाचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आलं. नवीन आमडेमधील जागेत उभारलेल्या घरांचं माळीणवासियांना लोकार्पण केलं गेलं.

30 जुलै 2014 ला पुणे जिल्ह्यातल्या माळीण गावावर डोंगरकडा कोसळूण संपूर्ण गाव दरडीखाली गाडलं गेलं होतं. या दुर्घटनेत 151 लोकांचा मृत्यू झाला होता. या घटनेला अडीच वर्ष पूर्ण झाली आहेत.

गेल्या अडीच वर्षात हे गाव इथून जवळच असलेल्या आमडेमध्ये पुनर्वसित करण्यात आलं. आमडेमध्ये ग्रामस्थांसाठी नवी घरं, नवी शाळा, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामपंचायत, गुरांचा गोठा, समाज मंदिर बांधण्यात आलंय.

या नव्या माळीणच्या लोकार्पणाचा कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्यांबरोबर केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर, चंद्रकांत पाटील, सुधीर मुनगंटीवार, पंकजा मुंडे, विष्णु सावरा, गिरीष बापट उपस्थित होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 2, 2017 07:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...