पुण्यात पोपटपंची.. CM म्हणाले, होंर्डिंग लावले म्हणजे तिकीट मिळेलच असं नाही!

पुण्यात पोपटपंची.. CM म्हणाले, होंर्डिंग लावले म्हणजे तिकीट मिळेलच असं नाही!

सध्या पुणे शहरात अक्षरशः फुटा फुटावर बॅनर्स, फ्लेक्स, होर्डिंग्ज यांची बजबजपुरी माजली आहे. निमित्त आहे मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचे...

  • Share this:

अद्वैत मेहता, (प्रतिनिधी)

पुणे, 15 सप्टेंबर: महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने पुणे शहरात लागलेल्या हजारो अवैध बॅनर्स, फ्लेक्स, होर्डिंग्जबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे. होंर्डिंग लावली म्हणजे तिकीट मिळेल असे नाही. अवैध बॅनर्स, फ्लेक्स, होर्डिंग्ज लावणाऱ्यांवर पक्षांतर्गत कारवाई करू, अशी पोपटपंची मुख्यमंत्र्यांनी केली आहे. गृहमंत्रिपद स्वत:कडे असलेल्या मुख्यमंत्र्यांनी खरं तर फौजदारी कारवाई करण्याची गरज आहे.

मुळात या होर्डिंग्जवर मुख्यमंत्री यांचीच छबी असल्याने कायद्यानुसार त्यांच्यावरच गुन्हा दाखल होऊ शकतो.

सध्या पुणे शहरात अक्षरशः फुटा फुटावर बॅनर्स, फ्लेक्स, होर्डिंग्ज यांची बजबजपुरी माजली आहे. निमित्त आहे मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेचे...एकीकडे होर्डिंग्ज लावण्यावरून कोथरूडच्या आमदार मेधा कुलकर्णी आणि भाजपचे कोथरूडमधील इच्छुक मुरलीधर मोहोळ यांचे कार्यकर्ते एकमेकांत भिडले होते. त्यांच्यातील तुंबळ हाणामारी एकमेकांचे मोबाइल फोडणे, कानशिलात लगावणे आणि डोके फोडण्यापर्यंत झाली. दुसरीकडे रस्त्यात लावलेल्या होंर्डिंगमुळे कर्वे रस्त्यावर रुग्णवाहिका अडकली. स्वाभाविकपणे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्रकार परिषदेत याबद्दल विचारले असता त्यांनी नाराजी व्यक्त करत पक्षांतर्गत कारवाईचे आश्वासन दिले. मात्र, कायद्यानुसार, हायकोर्टाच्या आदेशानुसार अवैध होर्डिंग, फ्लेक्स, बॅनर लावल्यास दंड आणि फौजदारी कारवाईची तरतूद आहे. विद्रुपीकरण करणे, उपद्रव देणे अशा कलमाअंतर्गत ज्यांची छबी असेल त्यालाही शिक्षा होऊ शकते. मग ते होर्डिंग, फ्लेक्स, बॅनरवर मुख्यमंत्री असो वा पंतप्रधान, असे कायदेतज्ज्ञ असीम सरोदे यांनी सांगितले आहे.

पोलीस असो वा महापालिका सरकारी यंत्रणांची भूमिका ही अशा बाबत बोट चेपेपणाचीच राहिली आहे. मग नेता कोणताही असो वा कोणत्याही पक्षाचा असो. विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असताना चिकित्सक, जागरूक, सतर्क, सजग अशी बिरुदे मिरवणारे पुणेकर नागरिक नाके मुरडण्यापलीकडे काही करणार का, असा सवाल उपस्थीत झाला आहे.

VIDEO: 'मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची यात्रा म्हणजे सर्वसामान्यांना त्रास'

First published: September 15, 2019, 2:15 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading