मराठी बातम्या /बातम्या /पुणे /Weather Forecast: राज्यात पुन्हा ढगांची दाटी; पुण्यासह 9 जिल्ह्यांत कोसळणार पाऊस

Weather Forecast: राज्यात पुन्हा ढगांची दाटी; पुण्यासह 9 जिल्ह्यांत कोसळणार पाऊस

विकेंडनंतर राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

विकेंडनंतर राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

Weather Forecast: आज महाराष्ट्रातील कोकण आणि घाट परिसरात सर्वदूर हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस (Rain in Maharashtra) कोसळण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.

पुणे, 03 ऑगस्ट: मागील काही  दिवसांपासून राज्यात अनेक ठिकाणी पावसानं (Rain in maharashtra) उघडीप दिली आहे. तर उत्तर भारतात मात्र पावसाचा जोर वाढला आहे. मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, राजस्थान, हिमाचल प्रदेश या राज्यात अनेक ठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. पश्चिम मध्य प्रदेश आणि पूर्व राजस्थनातील काही जिल्ह्यांना तर पावसानं झोडपून (Heavy Rainfall) काढलं आहे. त्यामुळे येथील अनेक नद्या दुथडी भरून वाहत आहेत. याठिकाणी आजही मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे.

सध्या मध्य प्रदेशात कमी दाबाचा पट्टा सक्रिय झाला आहे. त्यामुळे मागील चार पाच दिवसांपासून मध्य प्रदेश आणि आसपासच्या परिसरात पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. पण मागील तीन-चार दिवसांच्या तुलनेत आज पूर्व राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. हिमाचल प्रदेश आणि हरियाणात मात्र पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

हेही वाचा-डेल्टानंतर आता RS विषाणूचा हाहाकार; नवजात बालकं विळख्यात, काय आहेत लक्षणं?

सध्या उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि राज्यस्थान या तीन राज्यांच्या दरम्यान कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. त्यामुळे पुढील काही दिवस उत्तर भारतात पावसाच्या जोरदार सरी कोसळणार आहेत. दुसरीकडे दक्षिण भारतात मात्र पावसानं उघडीप घेतली आहे. तर आज महाराष्ट्रातील कोकण आणि घाट परिसरात सर्वदूर हलक्या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता आहे. पावसाला पोषक हवामान नसल्यानं विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात तुरळक ठिकाणी हलक्या सरी तर अन्य ठिकाणी पावसाची उघडीप राहणार आहे.

हेही वाचा-Maharashtra unlock: 22 जिल्ह्यांनी घेतला मोकळा श्वास; मुंबई, ठाणे unlock कधी?

आज पुण्यासह राज्यातील नऊ जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, रायगड, रत्नागिरी, ठाणे, पालघर आणि नाशिक या नऊ जिल्ह्यांना हवामान खात्यानं येलो अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. तर उद्या 4 ऑगस्ट रोजी, पुणे, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सातारा या पाच जिल्ह्यांच वरुणराजा बसरणार आहे. तर 5 आणि 6 ऑगस्ट रोजी राज्यात कोरडं हवामान राहण्याची शक्यता आहे.

First published:

Tags: Maharashtra, Pune rain, Todays weather