Home /News /pune /

पुणे हादरलं! जीवलग मित्रच झाले एकमेकांचे दुश्मन; एकावर सपासप वार, तर दुसऱ्याची गोळ्या झाडून हत्या

पुणे हादरलं! जीवलग मित्रच झाले एकमेकांचे दुश्मन; एकावर सपासप वार, तर दुसऱ्याची गोळ्या झाडून हत्या

Murder in Pune: मावळ तालुक्यातील शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक थरारक घटना समोर आली आहे. येथील दोन जीवलग मित्रांनी एकमेकांवर प्राणघातक हल्ला (Deadly attack) केल्याची घटना घडली आहे.

    पुणे, 22 जानेवारी: मावळ तालुक्यातील शिरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक थरारक घटना समोर आली आहे. येथील दोन जीवलग मित्रांनी एकमेकांवर प्राणघातक हल्ला (Deadly attack) केल्याची घटना घडली आहे. यामध्ये बंदुकीतून गोळ्या घातल्याने एका मित्रांचा मृत्यू झाला (friend shot dead) आहे, तर दुसरा मित्र गंभीर जखमी झाला आहे. जखमी तरुणावर हिंजवडी येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी मृत तरुणाच्या वडिलांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी विविध कलमाअंतर्गत गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. या घटनेचा पुढील तपास केला जात आहे. रोहन चंद्रकांत येवले असं हत्या झालेल्या 20 वर्षीय तरुणाचं नाव आहे. तर अविनाश भोईर असं हत्या करण्याऱ्या आरोपीचं नाव आहे. दोघेही एकमेंकाचे जीवलग मित्र असून ते शिरगाव परदंवडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील आढले खुर्द गावातील रहिवासी आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन दिवसांपूर्वी रोहन आणि अविनाश यांच्यात किरकोळ कारणातून वाद झाला होता. घटनेच्या दिवशी शुक्रवारी सकाळी अकरा वाजता पुन्हा एकदा त्यांच्यात वाद झाला. हेही वाचा-पुण्यात विधवा महिलेवर 8 जणांकडून बलात्कार, नराधमांनी केलेलं कृत्य वाचून हादराल या वादावादीनंतर संतापलेल्या रोहन याने आपल्याजवळील धारदार शस्त्राने अविनाशवर सपासप वार केले. यावेळी जखमी अवस्थेत असणाऱ्या अविनाशने आपल्याजवळील बंदुकीतून रोहनवर तीन गोळ्या झाडल्या आहेत. गोळ्या झाडताच रोहन घटनास्थळीच रक्ताच्या थारोळ्यात पडला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. तर जखमी अवस्थेतील अविनाश याला हिंजवडी येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे. या घटनेनंतर मृत रोहनचे वडील चंद्रकांत येवले यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. हेही वाचा-धारदार शस्त्राने वार करत दगडाने ठेचलं डोकं, निर्घृण खुनाच्या घटनेनं पुणे हादरलं! या घटनेनंतर आढले खुर्द गावात तणाव निर्माण झाला आहे. त्यामुळे पोलिसांनी गावात फौजफाटा तैनात केला आहे. आरोपी तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू असल्यानं पोलिसांनी अद्याप आरोपीला अटक केली नाही. रुग्णालयाबाहेर देखील पोलिसांनी सुरक्षा वाढवली आहे. नेमक्या कोणत्या वादातून ही हत्या झाली, याची कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही. जखमी तरुणाच्या चौकशीतून हत्येचं नेमकं कारण समोर येण्याची शक्यता आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Murder, Pune

    पुढील बातम्या