Home /News /pune /

जिल्हाधिकारी असल्याचं सांगत अनेकांना लाखोंचा गंडा; पुण्यातील महिलेचा प्रताप उघड

जिल्हाधिकारी असल्याचं सांगत अनेकांना लाखोंचा गंडा; पुण्यातील महिलेचा प्रताप उघड

पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office) एजंट (Agent) म्हणून काम करणाऱ्या एका महिलेनं आपण जिल्हाधिकारी आणि तहसिलदार असल्याची बतावणी करत अनेकांना लाखोंचा गंडा (Fraud) घातला आहे.

    पुणे, 28 जुलै: पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात (Collector Office) एजंट (Agent) म्हणून काम करणाऱ्या एका महिलेनं आपण जिल्हाधिकारी आणि तहसिलदार असल्याची बतावणी करत अनेकांना लाखोंचा गंडा (Fraud) घातला आहे. याप्रकरणी 5 ते 6 जणांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल (FIR Lodged) केली आहे. आरोपी महिलेनं आतापर्यंत जवळपास 50 ते 60 लाखांचा गंडा घातल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तातडीनं महिलेचा तपास करत तिला बेड्या ठोकल्या आहेत. अशाप्रकारे आणखी कोणाची फसवणूक झाली असल्यास, हडपसर पोलीस ठाण्याला कळवावे, असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. अनिता भीसे असं अटक केलेल्या आरोपी महिलेचं नाव आहे. ती येरवडा परिसरातील प्रतिकनगर येथील उत्तम टाऊन स्केप सोसायटीत भाडेकरू म्हणून राहते. हेही वाचा-दरमहा 1 लाख 10 हजारांचा सुरू होता हप्ता; लाच घेताना महसूल विभाग अधिकारी अटकेत सामनानं दिलेल्या वृत्तानुसार, आरोपी महिलेनं याच सोसायटीत राहणाऱ्या चित्तर दाम्पत्याची तब्बल 27 लाख 50 हजार रूपयांची फसवणूक केली आहे. आरोपी महिलेनं अंपगासाठी भुखंड मिळवून देण्याच्या बहाण्यानं या दाम्पत्याला लुटलं आहे. पण आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच पीडित दाम्पत्यानं हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. हेही वाचा-मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकलेल्या शिवसेनेच्या आमदाराला High Courtचा दिलासा गुन्हा दाखल होताच, घटनेच गांभीर्य लक्षात घेत हडपसर पोलिसांनी तातडीनं आरोपी महिलेला अटक केली आहे. संबंधित महिलेच्या घराची झडती घेतली असता, तिच्या घरात अनेक बनावट साहित्य आढळून आलं आहे. यामध्ये बनावट शिक्के आणि इतर बनावट कागदपत्रं आढळली आहेत. नोकरी लावण्यासाठी तयार करण्यात आलेली बनावट कागदपत्रंही पोलिसांनी जप्त केली आहेत. हेही वाचा-सिगरेटचा धूर तोंडावर सोडून महिलेला लुटलं; दीड तोळ्याचे दागिने घेऊन भामटे फरार संबंधित महिलेनं आपण जिल्हाधिकारी आणि तहसिलदार असल्याची बतावणी करत पुण्यातील अनेकांना लुटलं असल्याचा संशय पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. तसेच अशा पद्धतीनं कोणाचीही फसवणूक झाली असेल, तर त्वरित हडपसर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा. असं आवाहन पोलिसांनी केलं आहे. या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Financial fraud, Pune

    पुढील बातम्या