Home /News /pune /

पुण्यात बसचे झाले ब्रेक फेल, 7 ते 8 गाड्यांना दिली धडक, घटनास्थळाचा पहिला VIDEO

पुण्यात बसचे झाले ब्रेक फेल, 7 ते 8 गाड्यांना दिली धडक, घटनास्थळाचा पहिला VIDEO

 बसने 7 ते 8 वाहनांना धडक दिली आणि भिंतीला जाऊन आदळली. या अपघातात 2 ते 3 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

    नीलम कराळे, प्रतिनिधी पुणे, 11 मे : पुण्यात (pune) पुन्हा एकदा संतोष माने प्रकरणाचा थरार पाहण्यास मिळाला आहे. शहरातील कुमठेकर रोडवर (Kumthekar Road Pune) अचानक पीएमपीएल बसचे (pmpml bus) ब्रेक फेल झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अचानक ब्रेक फेल झाल्यामुळे या बसने 7. ते 8  वाहनांना धडक दिली. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, अनेक वाहनांचे अतोनात नुकसान झाले आहे. पुण्यातील कुमठेकर रोडवर पीएमपीएल बसचे अचानक ब्रेक फेल झाल्यामुळे समोर आललेल्या 7 ते 8 वाहनांना धडक दिली. ही बस हडपसरला चालली होती. पण कुमठेकर रोडवर अचानक बसचे ब्रेक फेल झाले आणि चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यावेळी बसने 7 ते 8 वाहनांना धडक दिली आणि भिंतीला जाऊन आदळली. या अपघातात 2 ते 3 जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले आहे. (प्राध्यापकांनो, पुणे विद्यापीठात नोकरीची संधी; गोल्डन चान्स सोडू नका; करा अर्ज) संध्याकाळच्यावेळी कुमठेकर रोडवर चांगलीच गर्दी असते. ऐन गर्दीच्या वेळी बसचे ब्रेक झाले होते. पण, चालकाने डाव्याबाजूने बस वळवली. त्यामुळे बस पुढे जाऊन भिंतीला आदळली. याच दरम्यान, सात ते आठ वाहनांना धडक बसली. यामध्ये काही रिक्षांचे नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच पीएमपीएल व्यवस्थापनाने घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त बस हटवण्यात आली आहे.
    First published:

    पुढील बातम्या