चिंचवड, 7 जानेवारी : कसबा पेठ आणि चिंचवड या दोन पोटनिवडणुकांसाठी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस होता. या दोन्ही निवडणुकांना बंडखोरीचं ग्रहण लागलं आहे, कारण सगळ्याच पक्षांच्या बंडखोरांकडून उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहेत. चिंचवडमध्ये तर एका उमेदवार अर्ज दाखल करताना 10 हजार रुपयांची चिल्लर घेऊन आला. याचा व्हिडिओ समोर आला आहे.
रयत विद्यार्थी परिषद संघटनेचे राजू काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यावेळी त्यांनी डिपॉझिट भरण्यासाठी 10 हजारांची चिल्लर आणली, त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्यांचा मोठा खोळंबा झाला. गल्लीत गोंधळ दिल्लीत मजुरा या गाजलेल्या मराठी चित्रपटामध्येही अभिनेता अर्ज दाखल करण्यासाठी चिल्लर घेऊन आल्याचं दाखवण्यात आलं, त्याचीच पुनरावृत्ती चिंचवडमध्ये झाली आहे.
चिंचवडमध्ये रयत विद्यार्थी परिषद संघटनेचे राजू काळे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला, त्यावेळी त्यांनी डिपॉझिट भरण्यासाठी 10 हजारांची चिल्लर आणली pic.twitter.com/qcUrOKuhyU
— News18Lokmat (@News18lokmat) February 7, 2023
बंडखोरीचं ग्रहण
लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांच्या निधनामुळे चिंचवड आणि कसबा पेठची पोटनिवडणूक होत आहे. चिंचवडमध्ये भाजपकडून लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप तर कसब्यामध्ये हेमंत रासने उमेदवार आहेत. तर महाविकासआघाडीमध्ये कसब्याची जागा काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि चिंचवडची जागा राष्ट्रवादीचे नाना काटे लढवत आहेत. पण या दोन्ही मतदारसंघामध्ये महाविकासआघाडीला बंडाचं ग्रहण लागलं आहे.
कसब्यामध्ये काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांनी तर चिंचवडमध्ये शिवसेनेच्या राहुल कलाटे यांनीही अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. याशिवाय कसब्यामध्ये हिंदू महासंघाचे आनंद दवे हे देखील रिंगणात उतरले आहेत. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी आनंद दवे यांनी रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.