पुणे, 07 फेब्रुवारी : शिवसेनेमध्ये आधीच मोठी पडझड झाल्यामुळे वाताहत झाली आहे. अशातच पिंपरी चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये बंडखोराने निशाण फडकावले असून राहुल कलाटे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे अर्ज जर मागे घेतला नाहीतर कारवाई केली जाईल, असा इशारा पुणे शिवसेना संपर्कप्रमुख सचिन अहिर यांनी दिला आहे.
चिंचवडमध्ये आज अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख होती. बंडखोरी होऊ नये म्हणून राष्ट्रवादीकडून नाना काटे यांना उमेदवारी जाहीर केली. पण कलाटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळे महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढली आहे.
'आम्ही किमान एक जागा लढविण्याची इच्छा होती. पण भाजपला रोखण्यासाठी आम्ही मविआने अधिकृत उमेदवार दिले आहे. राहुल कलाटेंची समजूत घालण्याचा प्रयत्न करू. नाही ऐकले तर मग पक्ष स्तरावर निर्णय घेवू. वेळ आली तर उद्धव ठाकरेही राहुल कलाटेंशी बोलतील, असं शेवाळे म्हणाले.
'व्यक्ती कितीही मोठा असला तरी मतदारांचा कौल मात्र मविआच्या बाजूने आहे. सेनेला मानणारा मतदार हा मविआ उमेदवाराच्या मागे उभे राहतील' असंही शेवाळे म्हणाले.
(चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये अजितदादांची वाढली डोकेदुखी, इच्छुक निघाले अर्ज भरायला!)
'मुख्यमंत्री शिंदे यांनी चॅलेज स्विकारले असेल तर त्यांनी आज प्रचाराचा नारळ फोडावा. त्यावेळी नगरविकास खात्यानेच नकारात्मक भूमिका घेवून स्पॅन वाढवायला नकार दिला होता. स्पॅन वाढल्यामुळे अडीचशे तीनशे कोटी वाढणार होते. हा पैसा आम्ही वरळी कोळीवाड्यातील विकासासाठी वापरणार आहोत. राजकारण करून डिवचण्याचा प्रयत्न होतोय, अशी टीकाही शेवाळेंनी केली.
'वरळीत मोठ्या प्रमाणात जेवणावळी आज ठेवल्यात,त्याचा आस्वाद त्यांनी घ्यावा. परंतु कोळीबांधव हे आमच्याच बाजूने राहतील. यावे,जेवावे पण राजकीय हेतू ठेवू नयेत' असा टोलाही शेवाळेंनी लगावला.
'बाळासाहेब थोरात हे ज्येष्ठ नेते आहेत. हा वाद आटोक्यात आणणं महत्वाचे. काँग्रेस वाढीला खिळ बसता कामा नये, अशी प्रतिक्रियाही शेवाळेंनी दिली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.