मराठी बातम्या /बातम्या /पुणे /चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये अजितदादांची वाढली डोकेदुखी, इच्छुक निघाले अर्ज भरायला!

चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये अजितदादांची वाढली डोकेदुखी, इच्छुक निघाले अर्ज भरायला!

राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर केल्यानंतर इच्छुक उमेदवाराची नाराजी उफाळून आली आहे.

राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर केल्यानंतर इच्छुक उमेदवाराची नाराजी उफाळून आली आहे.

राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर केल्यानंतर इच्छुक उमेदवारांची नाराजी उफाळून आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Pune, India

चिंचवड, 07 फेब्रुवारी : काँग्रेसमध्ये एकीकडे वाद चव्हाट्यावर आले आहे तर दुसरीकडे चिंचवड पोटनिवडणुकीतही महाविकास आघाडीमध्येही राडा झाला आहे. राष्ट्रवादीने उमेदवार जाहीर केल्यानंतर इच्छुक उमेदवाराची नाराजी उफाळून आली आहे. राहुल कलाटे हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवण्यावर ठाम आहे.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत महाविकास आघाडी तर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाना काटे हे उमेदवार असतील, अशी घोषणा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. पाटील यांनी घोषणा केल्यानंतर महाविकास आघाडीकडून इच्छुक असलेले राहुल कलाटे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

(Chinchwad by-election : भाजपची विनंती आणि राज ठाकरेंच्या पत्राला केराची टोपली, राष्ट्रवादीकडून अखेर चिंचवडमध्ये उमेदवार जाहीर)

त्यामुळे राष्ट्रवादीचे स्थानिक नेते हे राहुल कलाटे यांची मनधरणी करण्यासाठी त्यांच्या कार्यालयात दाखल झाले होते.  राहुल कलाटे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवारासाठी काम करतील अशी नेत्यांची अपेक्षा होती. पण नेत्यांचा मनधरणीचा प्रयत्न फसला. राहुल कलाटे आपल्या भूमिकेवर ठाम आहे. अपक्ष अर्ज भरून निवडणूक लढवणार असल्याचे राहुल कलाटेंनी जाहीर केलं. त्यामुळे राष्ट्रवादी पुढे मोठा पेच निर्माण झाला आहे.

विशेष म्हणजे, आज अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. कसब्यात काँग्रेसकडून उमेदवार ठरला आहे. तर चिंचवडमध्ये शेवटच्या क्षणी काटे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. आता राहुल कलाटे आक्रमक झाल्यामुळे चिंचवड पोटनिवडणूक चुरशीची होणार आहे.

कसब्यातून रवींद्र धंगेकरांना उमेदवारी

कसबा पोटनिवडणूक कोण लढवणार यावरून अखेर पडदा बाजूला झाला आहे. महाविकास आघाडीकडून काँग्रेसला कसबाची जागा सोडण्यात आली आहे. रवींद्र हेमराज धंगेकर यांच्या नावाची घोषणा दिल्ली हायकमांडकडून करण्यात आली आहे. सोमवारीच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुणे जिल्ह्यातील कसबा मतदारसंघात विधानसभेची पोटनिवडणूक महाविकास आघाडीचे सर्व घटक पक्ष एकत्रित लढणार आहेत.

(बाळासाहेब थोरातांनी राजीनामा दिला का? नाना पटोले यांची पहिली प्रतिक्रिया)

कसबा मतदारसंघाची जागा कॉंग्रेस पक्ष लढवणार असल्याचा निर्णय झाला असून येथून रवींद्र हेमराज धंगेकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात येत आहे, अशी घोषणा नाना पटोले यांनी केली होती. त्यामुळे कसब्यामध्ये रवींद्र धंगेकर विरुद्ध भाजपचे उमेदवार हेमंत रासने लढत पाहण्यास मिळणार आहे.

First published:

Tags: Ajit pawar