Elec-widget

पुण्यात छावा प्रतिष्ठानने या मागणीसाठी केले 'गोट्या खेलो आंदोलन'

पुण्यात छावा प्रतिष्ठानने या मागणीसाठी केले 'गोट्या खेलो आंदोलन'

पुनर्वसनासाठी देण्यात आलेल्या जमिनी बेकायदेशीर वाटप झाल्याचा गंभीर आरोप

  • Share this:

पुणे,21 नोव्हेंबर: शिरुर तालुक्यातील शेकडो एकर जमीन वाटपाबाबत गैरव्यवहार झाल्याचा आरोप करीत छावा प्रतिष्ठानने केला आहे. पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर छावा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी गोट्या खेळून आंदोलन करत प्रशासनाचा निषेध केला.

शिरूर तालुक्यातील पुनर्वसनासाठी देण्यात आलेल्या जमिनी बेकायदेशीर वाटप झाल्याचा गंभीर आरोप या छावा प्रतिष्ठान संघटनेने केला आहे. गेल्या वर्षभरापासून ही संघटना या कारभाराची चौकशीची मागणी करत आहे. मात्र, याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत अखेर छावा प्रतिष्ठानने 'गोट्या खेलो आंदोलन' करत जिल्हा प्रशासणाचा निषेध करण्यात आला.

छावा प्रतिष्ठानचे तेजस यादव म्हणाले, या जमीन वाटपाबाबत अटी, नियम आणि शर्तीचे उल्लंघन झाल्याचे दिसून येते. एकीकडे शेतकरी अडचणीत असून त्यांना कोणत्याही प्रकारची मदत मिळत नाही त्यातच पुनवर्सनाच्या जमिनी बेकायदा लाटणाऱ्यांना आणि यामध्ये सहभागी असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना मागणीचे निवेदन देण्यात आले.

या आंदोलनात पुणे जिल्ह्यातील शेतकरी आणि युवक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनाचे नेतृत्त्व छावा प्रतिष्ठानचे प्रमुख तेजस यादव यांनी केले .यावेळी स्वप्नील दरेगावकर यांच्यासह शेकडो कार्यकर्ते आंदोलनात सहभागी झाले होते.

दरम्यान, पुणे जिल्ह्यात पुनर्वसनाच्या जमिनीच्या वाटपामध्ये झालेल्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करण्याचे आदेश राज्याचे तत्कालीन महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी होते. त्यासाठी विशेष चौकशी अधिकारी नेमण्याची सूचनाही त्यांनी केली होती. हे प्रकरण उघड झाल्यानंतर जिल्हा प्रशासनाने त्यातील पाचशे ते सहाशे एकर जमीन ताब्यात घेतली आणि त्यावर पुन्हा सरकारचे नाव लावले. दौंड तसेच शिरूरमधील सुमारे दीड हजार एकर जमीन बोगस वाटप दाखल्याद्वांरे हडप केल्याची शंका उपस्थित करण्यात आली होती.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 21, 2019 03:52 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...
Listen to the latest songs, only on JioSaavn.com