मराठी बातम्या /बातम्या /पुणे /Serum मध्ये लागलेली आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू, घटनास्थळावरील 5 लेटेस्ट VIDEO

Serum मध्ये लागलेली आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू, घटनास्थळावरील 5 लेटेस्ट VIDEO

Pune Serum Institute Fire: नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार आग लागलेल्या ठिकाणी कुणीही अडकून पडले नाही आहे. तरीही अद्याप आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत

Pune Serum Institute Fire: नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार आग लागलेल्या ठिकाणी कुणीही अडकून पडले नाही आहे. तरीही अद्याप आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत

Pune Serum Institute Fire: नुकत्याच मिळालेल्या माहितीनुसार आग लागलेल्या ठिकाणी कुणीही अडकून पडले नाही आहे. तरीही अद्याप आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत

पुणे, 21 जानेवारी: संपूर्ण देशाचं लक्ष ज्या पुण्यातील सीरम इन्सिट्यूटकडे (Serum Institute of India) लागलं आहे, त्यामध्ये आग लागल्याने एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून आग विझवण्यासाठी अतोनात प्रयत्न सुरू आहे. दरम्यान घटनास्थळावरून की लेटेस्ट व्हिडीओ समोर येत आहेत, त्यावरून या आगीची भीषणता लक्षात येते आहे. दरम्यान या आगीनंतर लसनिर्मितीवर परिणाम होणार का असा सवाल सामान्यांना पडला आहे.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने संशोधित केलेली लस कोविशील्ड (Covishield)नावाने सीरम इन्स्टिट्यूट उत्पादित करत आहे. कोविशील्ड लशीचा स्टॉक सुरक्षित आहे. आगीचा कोणता धोका पोहोचलेला नाही. आग नवीन इमारतीच्या ठिकाणी लागली आहे. त्यामुळे या आगीचा लसनिर्मितीवर कुठलाही परिणाम होणार नाही, असं सीरम इन्स्टिट्यूटद्वारे सांगण्यात येत आहे.

दरम्यान पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यानी जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांना घटनास्थळी जाण्याचे आदेश दिले आहेत. अजित पवार देखील नियोजित दौऱ्यासाठी पुण्याच्या दिशेने निघाले आहेत. अजित पवार यांनी ही आग नेमकी कशामुळे लागली याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यांनी सध्या फोनवरून पुणे जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्त सौरव राव यांच्याकडुन प्राथमिक माहिती घेतली आहे. घटनास्थळाचे काही व्हिडीओ या आगीची भीषणता दाखवणारे आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार याठिकाणामधून सर्वांना बाहेर काढण्यात यश आलं आहे. SII मधील संशोधकांना देखील सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं होतं.

सीरम इन्स्टिट्यूटच्या बीसीजी लशीचा प्लांट असलेल्या  इमारतीमध्ये आग लागली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सिरम इन्स्टिट्यूट ला भेट दिली होती त्याच इमारतीत ही आग लागलेली आहे.

शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे. वेल्डिंगचं काम सुरू असताना आग लागली, अशीही माहिती मिळते आहे. मात्र करोनाची लस याठिकाणी तयार करण्यात येत असल्याने सर्व यंत्रणांनी या घटनेकडे गांभीर्याने लक्ष दिलं आहे. गुप्तचर यंत्रणेने  ही आग शॉर्टसर्किटमुळे आग लागली आहे की अन्य काही कारणांमुळे याचाही शोध घेण्यास सुरुवात केली आहे.

First published:
top videos

    Tags: Pune