PM मोदींच्या पुणे दौऱ्यात बदल! आता 4 तास असतील पुण्यात....240 मिनिटांचा मिनिट टू मिनिट कार्यक्रम

PM मोदींच्या पुणे दौऱ्यात बदल! आता 4 तास असतील पुण्यात....240 मिनिटांचा मिनिट टू मिनिट कार्यक्रम

दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूटला कडक पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे.

  • Share this:

पुणे, 27 नोव्हेंबर : पुण्यातील सिरम इनस्टिट्यूटमध्ये तयार करण्यात येत असलेल्या कोरोना लशीची आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी पुणे दौऱ्यावर येत आहेत. नरेंद्र मोदी यांच्या या पुणे दौऱ्याची जोरदार तयारी सुरू आहे. दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सिरम इन्स्टिट्यूटला आज सकाळपासूनच कडक पोलीस बंदोबस्त पाहायला मिळत आहे.

बॉम्ब शोधक व नाशक पथकाने सिरम इन्स्टिट्यूटची पाहणी केली आहे. शिवाय वाहतूक शाखेचे पोलीस सिरम इन्स्टिट्यूटच्या बाहेर तैनात करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी शनिवारी दुपारी सिरम इन्स्टिट्यूटला भेट देतील आणि लशीबाबत आढावा घेतील.

पंतप्रधान पुणे दौरा (सुधारीत वेळापत्रक)

दु. 3:50 वा. पुणे विमानतळावर आगमन

दु. 3:55 वा. हेलिकॉप्टरने सिरम इनस्टिट्यूट(मांजरी)कडे रवाना

दु. 4:15 वा. मांजरी हेलिपँडवर उतरणार, सिरम इनस्टिट्यूटकडे रवाना

दु. 4:25 वा. सिरम इनस्टिट्यूटमध्ये आगमन

दु. 4:25 ते संध्या. 5:25 वाजेपर्यंत सिरम इनस्टिट्यूटची पाहणी

संध्या. 5:30 वा. पुणे विमानतळाकडे रवाना

संध्या. 5:55 वा. पंतप्रधान दिल्लीला रवाना होणार

महत्त्वाचे अनेक नेते उपस्थित राहणार नाहीत!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पुणे दौरा स्वागतासाठी मुख्यमंत्री, राज्सपाल, विरोधी पक्ष नेते उपस्थितीत राहणार नाहीत. पंतप्रधान कार्यालयाने केलेल्या विनंतीनुसार कोरोना काळात अल्प कालावधी भेट असल्याने स्वागतासाठी येऊ नये असा निरोप आल्याची माहिती आहे. राजशिष्टारानुसार राज्यपाल, मुख्यमंत्री हे राज्यात पंतप्रधान आल्यावर त्यांचं स्वागत करतात.

Published by: Akshay Shitole
First published: November 27, 2020, 11:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading